शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: DC ची अडचण वाढली, रिषभ पंतवर एका सामन्याची बंदी अन् ३० लाखांचा दंड
2
"सत्तेचा गैरवापर करणे ही पंतप्रधान मोदींची खासियत"; शरद पवार यांचा शिरूरमधून हल्लाबोल
3
प्रचाराच्या अखेरच्या दिवशी शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने; छत्रपती संभाजीनगरात राडा
4
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
5
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
6
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
7
POK मध्ये युद्धजन्य परिस्थिती; पाकिस्तानच्या दादागिरीविरोधात काश्मिरी जनता रस्त्यावर
8
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
9
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)
10
भारीच! 18 तास काम केल्यावर 1000 रुपये मिळायचे; आता फुलांच्या शेतीतून झाला करोडपती
11
Fact Check : "मी तुम्हाला बेरोजगार करेन..."; योगी आदित्यनाथ यांच्या Video मागचं जाणून घ्या, 'सत्य'
12
Paytm चे 'अच्छे दिन' परतले; २ दिवसांत १३%ची वाढ, काय म्हणतायत एक्सपर्ट, किती आहे टार्गेट प्राईज?
13
मसाल्यांमधील ETO केमिकल्सवर सरकार अंकुश लावण्याच्या तयारीत, निर्यातदारांना करावं लागणार 'हे' काम
14
रवींद्र धंगेकरांचा भाजपावर गंभीर आरोप, म्हणाले, ‘पुण्यात पैशांचे ट्रक आलेत, आज फडणवीस वाटप करतील’
15
प्रज्वल रेवण्णा प्रकरण उघडकीस आणणारा भाजपा नेता अडचणीत, पोलिसांनी केली अटक, समोर आलं असं कारण   
16
'दिल्लीत बोलवून फाईल दाखवली अन्...'; भाजप प्रचाराचे कारण सांगत काँग्रेसची राज ठाकरेंवर टीका
17
पुण्यातील सभेनंतर संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल; "ते महाराष्ट्रद्रोही...."
18
"राहुल गांधी हे 'रणछोड दास'; जे स्वत: निवडणूक जिंकू शकत नाही, ते आपल्या पक्षाला..."
19
खळबळजनक ! नोटांनी भरलेला 'छोटा हाथी' वाहन पलटी; रस्त्यावर पडले तब्बल ७ कोटी
20
Mumbai Pali Hill Fire: मुंबईच्या पाली हिलमध्ये अग्नितांडव, थरकाप उडवणारा स्फोट; व्हिडिओ व्हायरल!

वीज कर्मचाऱ्यांचा दररोज मृत्यूशी सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2019 11:02 PM

पावसाळा म्हणजे वीज कर्मचाऱ्यांसाठी एखाद्या महायुद्धापेक्षा कमी नाही, वीजक्षेत्रात रिटेकला संधी नाही, एक चूक ही त्यांच्या आयुष्यातील अखेरची चूक ठरून त्यात त्यांना प्राण गमवावा किंवा कायमस्वरूपी अपंगत्वही येऊ शकते.

ठळक मुद्देप्राणाची बाजी लावत काम करतात महावितरणचे जनमित्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दररोज प्रत्यक्ष मृत्यूला सामोरे जाण्याचे धाडस करणारा महावितरणकर्मचारी आपले कर्तव्य पार पाडताना प्राणाची बाजी लावत लढवय्याप्रमाणे आपले काम करीत असतो. महावितरणकर्मचारी दररोज वीजरुपी आक्राळविक्राळ शत्रूचा सामना शूर लढवय्याप्रमाणे करीत असतो. त्यातल्या त्यात पावसाळा म्हणजे वीज कर्मचाऱ्यांसाठी एखाद्या महायुद्धापेक्षा कमी नाही, वीजक्षेत्रात रिटेकला संधी नाही, एक चूक ही त्यांच्या आयुष्यातील अखेरची चूक ठरून त्यात त्यांना प्राण गमवावा किंवा कायमस्वरूपी अपंगत्वही येऊ शकते. या सर्व गोष्टी विचारात घेऊनच सुरक्षेच्या उपाययोजनांची योग्य खातरजमा करून महावितरण कर्मचारी आपले कर्तव्य निभावित आहे.पावसाळ्याच्या सुरुवातील वीजवितरण यंत्रणेत अनेक बिघाड उद्भवतात, याचा राग ग्राहकांकडून वीज कर्मचाऱ्यांवर काढ़ला जातो, मात्र वीज जाण्यामागील कारणांचा विचारही कुणी करीत नाहीत, रात्री उशिरा वीजपुरवठा खंडित होतो आणि काही वेळेनंतर तो परत सुरळीत होतो, एकीकडे सर्वत्र आधुनिकीकरणाच्या दिशेने काम सुरु असले तरी उघड्या वीजवाहिन्याची यंत्रणा सुरू अथवा बंद करण्यासाठी आजही मनुष्यबळाची गरज आहे, पाऊस सुरु असतेवेळी वीजपुरवठा खंडित झाला म्हणजे कुणीतरी जनमित्र अंधाऱ्या रात्री भर पावसात आपल्या प्राणाची पर्वा न करता वीजखांबावर चढून आपले कर्तव्य बजावित असतो. याशिवाय वीज खांबात वीज प्रवाहित होऊ नये यासाठी वीज खांबांवर चॉकलेटी अथवा पांढºया रंगाचे चिनी मातीचे इन्सुलेटर्स बसविलेली असतात, बहुतांश वेळा अधिक उन अथवा वीज प्रवाहामुळे ही इन्सुलेटर्स गरम होतात आणि त्यावर पावसाच्या पाण्याचा एक थेंब पडला तरी ती फुटतात आणि यामुळे वीज खांबांमध्ये वीज प्रवाहित होऊन जमिनीत जाते अशा वेळी स्वयंचलित प्रणाली कार्यान्वित होऊन वीजवाहिनीचा पुरवठा खंडित होतो. तो बंद न झाल्यास प्राणांतिक आणि वित्त हानी होण्याची संभावना अधिक असते. वीजवाहिनीत अकस्मात काही तांत्रिक दोष निर्माण झाल्यास वीज उपकेंद्रातील कर्मचारी नजिकच्या उपकेंद्रासोबत संपर्क साधून तेथील वीजपुरवठ्याची स्थिती जाणून घेतात. वीजपुरवठा सुरळीत झाल्याची योग्य शहानिशा केल्यानंतरच वीजवाहिनीचा वीजपुरवठा सुरू केला जातो, आणि वाहिनी बंद झाली असल्यास संबंधित वाहिनी नादुरुस्त म्हणून जाहीर केली जाते.वाहिनीत झालेला बिघाड शोधणे देखील एकप्रकारे तारेवरची कसरत असते, पाऊस आणि अंधाराची पर्वा न करता शोधमोहिम राबविली जाते, कधी बंद पडलेल्या वाहिनीवरील सर्व वीज खांबांची तपासणी करावी लागते तर कधी काही खांबांदरम्यान बिघाड सापडतो.आज नागपूर शहरात ठिकठिकाणी सुरु असलेल्या विविध विकासकामांमुळे वीजवितरण वाहिन्यांची मोठ्या प्रमाणात क्षती झाली आहे, खोदकाम तुटलेले केबल जोडली असली तरी अनेकदा जोड असलेल्या भागात पाणी साचल्याने ती केबल नादुरुस्त होऊन वीजपुरवठ्यात व्यत्यय येतो, अशा वेळी हा बिघाड नेमका कुठे झाला हे शोधून काढणे जिकरीचे काम असतानाही वादळ-वारा याची तमा न बाळगता आपल्या कर्तव्याप्रति सदैव सजग असलेला वीज कर्मचारी प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीतही ग्राहकाला वीज मिळावी यासाठी झटत असतो. वीजपुरवठा खंडित होताच अनेकदा ग्राहक संबंधित जनमित्र किंवा अभियंत्याला फोन करणे सुरु करतात मात्र अशा वेळी फोनवर बोलण्याऐवजी वीजपुरवठा सुरळीत करायला त्याचे प्राधान्य असल्याने तो फोन घेण्यास असमर्थ असतो.वीज कर्मचाऱ्यांना सहकार्य कराअनेकदा वीज आली नाही म्हणून ग्राहक संतापतात, वीज कर्मचाऱ्यांवर राग काढतात. उपरोक्त सर्व गोष्टी विचारात घेता सुरक्षेच्या उपाययोजनांची योग्य खातरजमा करून महावितरण कर्मचारी आपले कर्तव्य निभावत असतात. यात त्यांना प्राण गमवावा किंवा कायमस्वरूपी अपंगत्वही येऊ शकते. तेव्हा त्यांना समजून घ्यावे, वीज कर्मचाऱ्यांवर दोषारोपण करणे टाळावे, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे. ग्राहकांनी महावितरणच्या नि:शुल्क कॉलसेंटरला किंवा मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून आपली तक्रार नोंदविण्याचे आवाहनही केले आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणEmployeeकर्मचारी