शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

वीज नागपुरात सर्वात महाग; प्रति युनिट सहा पैशांचा धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 10:42 IST

नागपूर महापालिकेच्या हद्दीतील वीज आता राज्यात सर्वात महाग झाली आहे. रस्त्यांच्या मध्ये आलेल्या वीज खांबांना हटवण्यासाठी वीज ग्राहकांकडून प्रति युनिट सहा पैसे अधिकचे घेण्यात येतील.

ठळक मुद्देमार्चनंतर वर्षभर बिलाद्वारे होणार वसुलीहटवण्यात येतील १२५८ विद्युत खांबवसूल केले जातील १०.९ कोटीडीपीआर ७४ कोटी रुपयांचामनपाचा हिस्सा ३७ कोटींचाप्रति युनिट वाढ ६ पैशांचीएक वर्षापर्यंत होणार वसुली

कमल शर्मा ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर महापालिकेच्या हद्दीतील वीज आता राज्यात सर्वात महाग झाली आहे. रस्त्यांच्या मध्ये आलेल्या वीज खांबांना हटवण्यासाठी वीज ग्राहकांकडून प्रति युनिट सहा पैसे अधिकचे घेण्यात येतील. मार्चमध्ये येणाऱ्या बिलावर याचा परिणाम स्पष्टपणे दिसून येईल. महावितरणचे म्हणणे आहे की, या माध्यमातून नागरिकांकडून १०.९९ कोटी रुपये वसूल कले जातील आणि यासाठी एक वर्षाचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.विशेष म्हणजे लोकमतने डिसेंबरमध्येच याबाबतचे संकेत दिले होते की, रस्त्यांमधील विजेचे खांब हटवण्यासाठी नागरिकांवरच भुर्दंड बसवण्यात येणार आहे. आता महावितरणच्या मुख्यालयाने एक पत्र पाठवून महावितरणचे मुख्य अभियंता आणि फ्रेन्चाईजी एसएनडीएलला याची सूचना दिलेली आहे. हे प्रकरण वर्ष २००१-०२ मध्ये आयआरडीपी अंतर्गत शहरात बनलेल्या रस्त्यांशी संबंधित आहे. रस्ते रुंदीकरणामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब रस्त्यांच्या मध्ये आले. ते हटवण्यासाठी ९१.५ कोटी रुपयाचे इस्टीमेट तयार करण्यात आले होते.यासोबतच महापालिका आणि महावितरण यांच्यात या गोष्टीवरून वाद झाला की, खांब हटवण्याची जबाबदारी नेमकी कुणाची आहे. हा वाद न्यायालयापर्यंत गेला. दहा वर्षानंतर म्हणजेच २०११ मध्ये असे ठरले की अर्धा-अर्धा खर्च उचलण्यात येईल. महावितरणने आपला हिस्सा देण्यासाठी शहरातील वीज ग्राहकांकडून २०१२ ते २०१५ पर्यंत वीज बिलाच्या माध्यमातून प्रति युनिट ९ पैसे वसूल केले आहे. त्यांनी मनपाला पैसे दिले आणि मनपाने वीज खांब हटवण्यास सुरुवात केली. यानंतर मनपाने आर्थिक परिस्थिती हलाकीची असल्याचा हवाला देत आपले हात झटकले. त्यामुळे केवळ ४१ कोटी रुपयाचेच काम होऊ शकले. त्यामुळे केवळ अर्धेच खांब हटवण्यात आले. यातही बहुतांश खांब हे शहरातील उच्चभ्रू वस्त्यांमध्ये होते. या दरम्यान रस्त्यावरील वीज खांबांमुळे अपघातांच्या अनेक घटना घडल्या. खांब हटवण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. न्यायालयाने मार्चपर्यंत खांब हटवण्यास सुरुवात करण्याचे निर्देश दिले. आता मनपा आणि महावितरणने सर्वे करून नवीन इस्टीमेट तयार केले आहे. पूर्वीप्रमाणेच दोघेही अर्धा-अर्धा खर्च उचलतील. महावितरणने आपल्या हिस्स्यातील पैसे देण्यासाठी २०१२ प्रमाणे पुन्हा नागरिकांकडून वसुलीचा निर्णय घेतला आहे. नवीन डीपीआरप्रमाणे शहरात १२५८ वीज खांबांना हटवायचे आहे. यात सर्वाधिक ११८४ खांब एसएनडीएलच्या क्षेत्रातील आहेत. यात ५२१ खांब एचटी आणि ६६३ खांब एलटी लाईनचे आहेत.

५०.५ कोटी झाले ७४ कोटीखांब हटवण्याचे काम पूर्वीच्या डीपीआरनुसार झाले असते तर २३.५ कोटी रुपये वाचले असते. तेव्हा एकूण ९१.५ कोटी रुपयाचे इस्टीमेट तयार झाले होते. परंतु काम केवळ ४१ कोटी रुपयाचेच होऊ शकले. त्यामुळे साहजिकच ५०.५ कोटी रुपयाचे काम शिल्लक राहिले होते. आता सात वर्षानंतर उर्वरित कामावरचा खर्च वाढून ७४ कोटी रुपये झाला आहे. मनपा व महावितरणचा दावा आहे की, खांबासह खर्चही वाढला आहे. परंतु खांब हटवण्यासाठी वीज ग्राहकांनी अगोदरच पैसे दिले असताना नागरिकांनी पुन्हा पैसे का म्हणून द्यावे?

महावितरणकडे आहेत २५ कोटी रुपये जमानवीन डीपीआरअंतर्गत मनपा आणि महावितरणला प्रत्येकी ३७ कोटी रुपये खर्च करावयाचे आहे. महावितरणचे प्रभारी प्रादेशिक संचालक घुगल यांच्यानुसार, महावितरणकडे २०१२ ते २०१५ दरम्यान नागरिकांकडून वसूल करण्यात आलेले २५ कोटी रुपये जमा आहेत. कंपनीने मनपाला यासाठी दोन कोटी रुपये दिलेले आहेत. त्यामुळे कंपनीला नागरिकांकडून एका वर्षात वसूल होणारे १०.९९ कोटी रुपयेच घ्यायचे आहे.

टॅग्स :electricityवीज