शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

विजेची केबल नाही मिळाले, अंबाझरी पुलाचे काम अडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2024 00:05 IST

गेल्या वर्षी अंबाझरी ओव्हरफ्लो झाल्यामुळे परिसरात मोठा पूर आला होता.

नरेश डोंगरे, नागपूर : अंबाझरी ओव्हरफ्लोसमोर विवेकानंद स्मारकाजवळ असलेल्या नवीन पुलाचे काम अडकले आहे. शनिवारी विजेची लाइन शिफ्ट करून हा पूल तोडण्याचे काम सुरू केले जाणार होते. मात्र, परिश्रम घेऊनही पीडब्ल्यूडीला विजेचे केबल न मिळाल्यामुळे हे काम आता रेंगाळले आहे. गेल्या वर्षी अंबाझरी ओव्हरफ्लो झाल्यामुळे परिसरात मोठा पूर आला होता. त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून नवीन पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. 

या महिन्यात जुना पूल तोडण्याचे काम सुरू झाले. तिकडे महावितरणच्या ३३ केव्ही हिंगणा शंकरनगरची लाइन क्षतिग्रस्त झाली. परिणामी पीडब्ल्यूडी आणि महावितरणमध्ये वाद झाल्याने १५ मेपासून पूल तोडण्याचे काम बंद झाले. पुलाच्या कामातील अडथळा दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांनी दोन्ही विभागातील अधिकाऱ्यांना समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर लाइन शिफ्टिंगचे काम पीडब्ल्यूडीचा इलेक्ट्रिकल विभाग महावितरणच्या मार्गदर्शनात काम करेल, असे ठरले. त्यानुसार शनिवारी लाइन शिफ्ट केली जाणार होती. मात्र, पीडब्ल्यूडीला केवळ तीनच केबल मिळाले. दोन अजून मिळायचे असल्याने शिफ्टिंगच्या कामाला ब्रेक लागला आहे.---------------

१५ ऑगस्टपर्यंत नवीन पूल; एक महिना वाहतूक बंददरम्यान, पीडब्ल्यूडीच्या दाव्यानुसार, १५ ऑगस्टपर्यंत नवीन पुलाचे काम पूर्ण होईल. केबल शिफ्ट झाल्यानंतर शिल्लक पूल तोडण्याचे काम सुरू होईल. त्यामुळे १५ जुलैपासून वाहतूक बंद करून पुलाचे काम पूर्ण केले जाणार आहे. तिकडे महावितरण म्हणते की, वीजपुरवठा प्रभावित होऊ नये म्हणून लाइन शिफ्टिंगचे काम लवकरच पूर्ण केले जाईल.

--------------                                                                                                                                                                          डिझाइन कुण्या कामाची

पुलाखालून महावितरणची लाइन कुठून गेली त्याचा पत्ता लागलेला नाही. महावितरणकडे असलेली डिझाइनसुद्धा उपयोगी पडू पाहत नाही. कंपनीच्या म्हणण्यानुसार, सुमारे २० वर्षांपूर्वीचे डिझाइन आहे. केबलवर अनेकदा काँक्रीट टाकण्यात आल्याने ही लाइन कुठून गेली, ते कळेनासे झाले आहे.

टॅग्स :nagpurनागपूर