शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत खांब, ट्रान्सफार्मर रस्त्यावर

By admin | Updated: May 3, 2015 02:12 IST

लालगंज व प्रेमनगर परिसरातील रस्त्यांचे रुंदीकरण होऊन पाच वर्षांच्यावर कालावधी झाला.

नागपूर : लालगंज व प्रेमनगर परिसरातील रस्त्यांचे रुंदीकरण होऊन पाच वर्षांच्यावर कालावधी झाला. परंतु रुंदीकरणामुळे रस्त्याच्या मधोमध आलेले विद्युत खांब व ट्रान्सफार्मर अद्यापही हटविण्यात आलेले नाहीत. रहदारीला अडथळा ठरत असलेले हे खांब अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. विशेष म्हणजे, रस्त्यावरील विद्युत खांब हटविण्याचे न्यायालयाचे स्पष्ट निर्देश असतानाही संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. यासंदर्भात लालगंज सुधार संघर्ष समितीच्यावतीने मनपा आयुक्त, एसएनडीएल नागपूर विभाग, पोलीस आयुक्त, उत्तर नागपूर वाहतूक विभागाला निवेदन दिले, त्यानंतर स्मरणपत्रही दिले. परंतु उपाययोजना होत नसल्याने, संतप्त नागरिक व समितीने दोषी अधिकाऱ्यांच्या निंलबंन आंदोलनाचा इशारा दिला आहे.प्रभाग १७, बस्तरवारी येथील लालगंज परिसरातील राऊत चौक ते दहीबाजार चौक रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम होऊन आठ वर्षे झाली. यात ३०वर विद्युत खांब व दोन ट्रान्सफार्मर रस्त्याच्या मधोमध आले. तसेच प्रेमनगर परिसरातील रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम पाच वर्षांपूर्वी झाले. यातही ३०वर विद्युत खांब व तीन ट्रान्सफार्मर रस्त्यावर आले. यामुळे आतापर्यंत अनेक वाहनचालक जखमी तर काही अपंग झाले आहेत. समितीचे अध्यक्ष गुणवंत झाडे यांनी सांगितले की, या परिसरात लवकरच मस्कासाथ उड्डाणपुलाच्या दुसऱ्या टप्प्यातील काम सुरू होणार आहे. यामुळे हा पूल बंद झाल्यास खैरीपुरा, नाईक तलाव, बांगलादेश येथील वाहतूक दहीबाजार पुलावरून जाईल. सध्या दहीबाजार पुलाचे काम अर्धवट झालेले आहे. असे असतानाही शांतिनगर, कावळापेठ, कळमना, कामठी, कन्हान, जबलपूर-शिवनी, रामटेकपर्यंतची वाहतूक या पुलावरून जाते. जेव्हा मस्कासाथ पुलाचे काम सुरू होईल तेव्हा या पुलावरील वाहतूक दुप्पट होईल आणि याच मार्गावर रस्त्यावर आलेले विद्युत खांब आणि ट्रान्सफार्मर वाहनचालकांसाठी कर्दनकाळ ठरेल.१५ एप्रिल रोजी रस्त्याच्या मधोमध असलेल्या एका विद्युत खांबाला वाहनाची धडक बसली. खांब खाली कोसळला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. परंतु खांब हटविण्यापासून नवीन खांब लावण्यापर्यंत परिसरातील वीज २४ तास खंडित होती. अशा अनेक समस्यांना येथील नागरिक तोंड देत आहेत. याची दखल लालगंज सुधार संघर्ष समितीने घेत या दोन्ही मार्गावरील विद्युत खांब हटविण्यासाठी १६ जानेवारी रोजी पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त, लकडगंज पोलीस स्टेशन, उत्तर नागपूर वाहतूक विभाग, मनपाच्या झोन क्र. ७ सतरंजीपुरा यांना निवेदन दिले. रस्त्यावरील खांब हटविण्याची मागणी केली. तसेच एसएनडीएलचे बिझनेस हेड खुराणा आणि शंकरपूरकर यांनाही खांब हटविण्याची मागणी केली. त्यावेळी त्यांनी तीन महिन्यात खांब हटविण्याचे आश्वासन दिले. परंतु त्यानंतरही खांब जागेवर कायम होते. मात्र समस्या अद्यापही कायम आहे.