शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

इलेक्ट्रिक बस खरेदी प्रकरण; कोट्यवधीचे अनुदान द्यावयाचे आहे, कराराची प्रत तर द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 11:58 IST

११ जून २०२० रोजी केंद्र सरकारचे अवजड उद्योग मंत्रालयाने महापालिकेला एक पत्र पाठवून बस खरेदीसंदर्भात करण्यात आलेल्या करारनाम्याची प्रत सादर करण्यास सांगितले आहे.

ठळक मुद्देअवजड उद्योग मंत्रालयाने पाठवले मनपाला पत्र

राजीव सिंहलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बिकट आर्थिक परिस्थितीचे मनपा प्रशासनाचे रडगाणे सुरू असतानाच ४० इलेक्ट्रिक बस खरेदीसाठी केंद्र सरकारचे अवजड उद्योग मंत्रालय महापालिकेला कोट्यवधी रुपयांचे अनुदान देण्यास तयार आहे. ११ जून २०२० रोजी संबंधित मंत्रालयाने महापालिकेला एक पत्र पाठवून बस खरेदीसंदर्भात करण्यात आलेल्या करारनाम्याची प्रत सादर करण्यास सांगितले आहे. यासाठी ३० जूनपर्यंत मुदत दिली आहे. परंतु मनपा प्रशासनाकडून अद्याप करारनाम्याची प्रत मंत्रालयाला पाठविण्यात आलेली नाही.जून महिना संपायला एक दिवस शिल्लक आहे. त्यामुळे महापालिकेला अनुदान मिळणार की नाही, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार संबंधित इलेक्ट्रिक बस कंपनी व महापालिका प्रशासन यांच्यात कराराच्या अंतिम मसुद्यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. या पार्श्वभूमीवर मंगळवारी परिवहन समितीची सभा बोलावण्यात आली आहे.मनपा परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अवजड उद्योग मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून ८ जुलैपर्यंत कराराची प्रत सादर करणार असल्याची हमी दिली आहे.मनपा अधिकाºयांनी लॉकडाऊन व वाढत्या कोविड संसर्गाचे कारण पुढे करून मुदतवाढ मागितली आहे. मनपा ४९ मिडी बस खरेदी करणार आहे. प्रति बस मनपाला ४५ लाख मिळणार आहे. वास्तविक बसची किंमत १.४८ कोटी आहे. मनपाला सुमारे १८ कोटीचे अनुदान मिळू शकते.विशेष म्हणजे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांनी इलेक्ट्रिक बस वाहतुकीला तेजस्विनी बसच्या माध्यमातून सुरुवात झाली. या पाच बसेस शहरात धावत आहेत. यादरम्यान केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाने राज्यातील अर्धा डझन महापालिकांना इलेक्ट्रिक बस खरेदीवर अनुदान देण्याची योजना सादर केली. यात नागपूर महापालिकेला १०० बस खरेदीवर अनुदान देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली होती. परंतु तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर यांनी ४० बस खरेदी करण्याला मंजुरी दिली.निविदा प्रक्रिया झाली आहे. इवे ट्रान्स प्रा. लिमिटेडला काम दिले आहे. २८ फेब्रुवारीला प्रक्रिया पूर्ण झाली आहे. परंतु कोविड संक्रमणामुळे हा प्रस्ताव रखडला आहे.मनपावर आर्थिक बोजा नाहीमहापालिकेने खासगी कंपनीशी करार केला आहे. त्या कंपनीला बस संचालनासाठी प्रति किलोमीटर ६६.३५ रुपये देण्याचा करार करण्यात आला आहे. कंपनीने आधी ७२.९९ प्रति बस - प्रति किमी दर दिला होता. परंतु दर कमी करण्यात मनपा यशस्वी ठरली. संबंधित दरानुसार मनपा रक्कम देणार आहे, तर कंपनी स्वत: ४० बसेस खरेदी करणार आहे. अनुदान मनपाला मिळणार असून, ते कंपनीला देणार आहे. बसची उर्वरित रक्कम प्रति किलोमीटरनुसार देण्यात येणाऱ्या रकमेतून कंपनीला मिळणार आहे.८ जुलैपर्यंत वेळ मागितलीबस करारासंदर्भात दस्तऐवज सादर करण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत होती. परंतु कोविडमुळे बैठक घेण्याला वेळ मिळाला नाही. केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. ही मुदत ८ जुलैपर्यंत वाढवून मागितली आहे. त्यांना कराराची प्रत पाठविली जाईल. अनुदान परत जाणार नाही, अशी माहिती परिवहन सभापती बाल्या बोरकर यांनी दिली.

 

टॅग्स :electric vehicleवीजेवर चालणारं वाहन