शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

निर्भय व निष्पक्ष वातावरणात निवडणूक व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 00:38 IST

लोकशाहीत सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधकांचीही भूमिका महत्त्वाची असते. त्यांनाही विश्वासात घेतले पाहिजे. दुर्दैवाने आज निवडणुकांना इव्हेंट मॅनेजमेंट आणि मार्केटिंगचे स्वरूप आले आहे. निकोप लोकशाहीसाठी हे घातक असून निवडणुका निर्भय व निष्पक्ष वातावणात व्हाव्यात, असे मत असित सिन्हा यांनी शनिवारी व्यक्त केले.

ठळक मुद्देअसित सिन्हा : पब्लिक रिलेशन्न्स सोसायटी आॅफ इंडियातर्फे जनसंपर्क दिनाचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकशाहीत सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधकांचीही भूमिका महत्त्वाची असते. त्यांनाही विश्वासात घेतले पाहिजे. दुर्दैवाने आज निवडणुकांना इव्हेंट मॅनेजमेंट आणि मार्केटिंगचे स्वरूप आले आहे. निकोप लोकशाहीसाठी हे घातक असून निवडणुका निर्भय व निष्पक्ष वातावणात व्हाव्यात, असे मत असित सिन्हा यांनी शनिवारी व्यक्त केले.पब्लिक रिलेशन्स सोसायटी आॅफ इंडियाच्या नागपूर शाखेतर्फे लोकमत भवनातील जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी येथे राष्ट्रीय जनसंपर्क दिन कार्यक्रमानिमित्त आयोजित ‘भारतीय लोकतंत्र सार्थक चुनाव का मंत्र’ कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून असित सिन्हा बोलत होते. अध्यक्षस्थानी नागपूर व अमरावती विभागाचे माहिती व जनसंपर्क उपसंचालक राधाकृष्ण मुळी, पब्लिक रिलेशन्स सोसायटी आॅफ इंडिया नागपूर शाखेचे अध्यक्ष एस.पी. सिंग, अतुल त्रिवेदी आदी उपस्थित होते.सिन्हा म्हणाले, राजकीय पक्षांचे निवडणूक जाहीरनामे जवळपास सारखेच असतात. परंतु ‘कथनी व करनी’ यात फरक आहे. राजकारणात स्वच्छ चारित्र्याच्या लोकांनी येण्याची गरज आहे. विविध घटकांत संवाद असला पाहिजे. संविधानाला समानता अभिप्रेत आहे. परंतु आज निवडणुका पैशाच्या बळावर लढल्या जातात. मतदान यंत्रामुळे देशातील नागरिक चिंतित आहेत. अशापरिस्थितीत देशातील लोकशाही बळकट होणार नसल्याचे असित सिन्हा म्हणाले.आपल्या देशाची संसदीय मार्गानेच प्रगती झाली आहे. दैनंदिन जीवनात लोकशाहीची मूल्ये जपली तर देशातील लोकशाही बळकट होण्याला मदत होईल. जगात लोकशाहीपेक्षा दुसरी कोणतीही व्यवस्था प्रभावी नाही, असे विचार राधाकृष्ण मुळी यांनी अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले. प्रारंभी पब्लिक रिलेशन्न्स सोसायटी आॅफ इंडियाच्या नागपूर शाखेचे अध्यक्ष एस.पी. सिंग यांनी प्रास्ताविकातून भारतीय लोकशाही व अभिप्रेत निवडणूक प्रक्रिया तसेच संस्थेच्या कामकाजावर प्रकाश टाकला. सूत्रसंचालन अतुल त्रिवेदी यांनी तर आभार संस्थेचे सदस्य सुधीर जाधव यांनी मानले. यावेळी शोभा धनवटे, नरेश मेश्राम, यशवंत मोहिते, योगश विटणकर, रवींद्र मिश्रा यांच्यासह संस्थेचे सदस्य उपस्थित होते.कोल्हटकर व देशमुख यांचा गौरवराष्ट्रीय जनसंपर्क दिन कार्यक्रमात उत्कृष्ट जनसंपर्क अधिकारी म्हणून नागपूर महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर व एम.एस.देशमुख यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊ न गौरव करण्यात आला.

टॅग्स :Journalistपत्रकारnagpurनागपूर