शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील वकील संघटनांच्या निवडणुका पुढे ढकलल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 01:03 IST

Elections for lawyers' unions postponed कोरोना संक्रमणामुळे कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये याकरिता बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अ‍ॅण्ड गोवाने महाराष्ट्र व गोवामधील मान्यताप्राप्त वकील संघटनांच्या प्रस्तावित निवडणुका येत्या ३१ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देबार कौन्सिलने कोरोनामुळे घेतला निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना संक्रमणामुळे कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये याकरिता बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अ‍ॅण्ड गोवाने महाराष्ट्र व गोवामधील मान्यताप्राप्त वकील संघटनांच्या प्रस्तावित निवडणुका येत्या ३१ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

यासंदर्भात कौन्सिलच्या कार्यकारी मंडळाची नुकतीच ऑनलाईन बैठक झाली. त्यात दोन्ही राज्यातील विविध वकील संघटनांनी निवडणुका पुढे ढकलण्यासाठी सादर केलेल्या निवेदनांवर सखोल विचारमंथन करण्यात आले. दरम्यान, वर्तमान कोरोना संक्रमण, सरकारद्वारे लागू विविध निर्बंध, कोरोना संक्रमणाची संभाव्य तिसरी लाट, वकिलांच्या आरोग्याचे रक्षण इत्यादी बाबी लक्षात घेता निवडणुका घेणे धोकादायक ठरेल असे मत सर्वांनी व्यक्त केले. परिणामी, निवडणुका येत्या ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.

हा निर्णय आवश्यक होता

गेल्या काही महिन्यांत कोरोना संक्रमणामुळे अनेक वकिलांना प्राण गमवावे लागले. तसेच, कोरोना उपचारावर झालेल्या खर्चामुळे अनेक वकिलांचे आर्थिक गणित बिघडले. करिता, निवडणुका पुढे ढकलणे आवश्यक होते.

 अ‍ॅड. अनिल गोवारदीपे, अध्यक्ष, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अ‍ॅण्ड गोवा.

टॅग्स :advocateवकिलElectionनिवडणूक