शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बॅलेटने निवडणुका पारदर्शी आणि कमी खर्चिक; राजकुमार तिरपुडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 10:34 IST

विदेशांमध्ये ईव्हीएम बंद करून बॅलेटचा वापर निवडणुकीत करण्यात येत आहे. त्यामुळे भारतातील निवडणुका ह्या बॅलेटनेच घ्याव्यात, अशी अपेक्षा विदर्भ माझा पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार तिरपुडे यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देईव्हीएम आणि मतपत्रिकेचे तुलनात्मक विश्लेषण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निवडणूक आयोगाने ईव्हीएमद्वारे निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला खरा, पण प्रत्येक निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएमच्या विश्वसनीयतेवर संशय व्यक्त करण्यात येण्याचे प्रकार घडताहेत. ईव्हीएम हे यंत्र असल्याने, त्यात तांत्रिक बदल करून निवडणुकीचे निकाल बदलविता येऊ शकतात. त्यामुळे ईव्हीएमद्वारे निवडणुका पारदर्शी नाहीच. विदेशांमध्ये ईव्हीएम बंद करून बॅलेटचा वापर निवडणुकीत करण्यात येत आहे. त्यामुळे निवडणुक आयोगाने सुद्धा वारंवार होणारे आक्षेप लक्षात घेता, भारतातील निवडणुका ह्या बॅलेटनेच घ्याव्यात, अशी अपेक्षा विदर्भ माझा पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार तिरपुडे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.ते म्हणाले की बॅलेटद्वारे घेण्यात येणाऱ्या निवडणुका ईव्हीएमच्या तुलनेत कमी खर्चात होतात. एक विधानसभा क्षेत्राच्या निवडणुकीसाठी १५० केंद्र असतात. प्रत्येक केंद्रावर २० हजार रुपये किमतीच्या ईव्हीएम मशीनची आवश्यकता असते. ज्याची एकूण किंमत ३० लाख रुपये होते. सोबतच मशीनच्या देखभालीचा खर्च वेगळा असतो.तुलनेत मतपत्रिकेचा विचार केला असला, निवडणुकीत एका उमेदवाराकडून १० हजार रुपये शुल्क निवडणुक आयोग घेते.एका विधानसभा क्षेत्रात १० उमेदवार उभे राहिल्यास १ लाख रुपये होतात. एका विधानसभा क्षेत्रासाठी दीड लाख मतपत्रिका छापण्यासाठी १५ हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे मतपत्रिकेचा खर्च हा ईव्हीएमच्या तुलनेत अतिशय अत्यल्प आहे. शिवाय निवडणुक ीचा खर्च हा करदात्यांकडून वसूल केला जातो. त्यामुळे नागरिकांवरच त्याचा भुर्दंड बसतो.शिवाय मतपत्रिकेद्वारे मतदान केल्यानंतर मतदार हा आश्वस्त होतो. त्याला योग्य व्यक्तीला मतदान केल्याचे समाधान होते. त्यामुळे निवडणुकीचा खर्च कमी करण्यासाठी मतपत्रिकेद्वारे निवडणुका होणे गरजेचे असल्याचे तिरपुडे म्हणाले. पत्रपरिषदेला जयंत कुंभारे, अविनाश नागदिवे उपस्थित होते.

विदर्भ राज्य संकल्प दिवस साजराराज्याचे पहिले उपमुख्यमंत्री नाशिकराव उपाख्य बाळासाहेब तिरपुडे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून शनिवार १९ मे रोजी विदर्भ राज्य संकल्प दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. विदर्भातील सर्वच क्षेत्रातील नागरिकांनी स्वतंत्र विदर्भ राज्याच्या संकल्पाचे सामूहिक वाचन करावे , असे आवाहन तिरपुडे यांनी केले.

टॅग्स :Electionनिवडणूक