शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

निवडणूक चिन्हांमध्ये आता माऊस, पेनड्राईव्ह,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:10 IST

आकर्षक चिन्हावर उमेदवारांचा डोळा : ४ जानेवारीला होणार चिन्हांचे वाटप नागपूर/उमरेड : जिल्ह्यात १३० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली ...

आकर्षक चिन्हावर उमेदवारांचा डोळा : ४ जानेवारीला होणार चिन्हांचे वाटप

नागपूर/उमरेड : जिल्ह्यात १३० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. ३१ डिसेंबरला उमेदवारी अर्जाच्या छाननीअंती ३१२८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. ४ जानेवारीला दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. याच दिवशी निवडणूक चिन्हाचे वाटप होईल. सध्या गावागावांत राजकीय मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. पॅनेलमध्ये संधी न मिळालेल्या नाराजांची मनधरणी करण्याचे काम विविध राजकीय गटाकडून केले जात आहे. इकडे ग्रामपंचायतीच्या आखाड्यात उतरणाऱ्यांचे आता निवडणूक चिन्हाकडे लक्ष लागले आहे. यावेळी तब्बल १९० निवडणूक चिन्हांची यादी निवडणूक आयोगाने जारी केली आहे. यातून एका चिन्हाची निवड उमेदवाराला करता येणार आहे. यापूर्वीच्या ग्रामपंचायत निवडणुकीत एकूण ४८ चिन्हांचा समावेश होता. आता यात चांगलीच भर पडल्याने उमेदवारांसमोर चिन्ह निवडण्याबाबतचा पेच निर्माण झाला आहे. इच्छुक उमेदवार तहसील कार्यालयात येऊन संबंधित अधिकाऱ्यांकडे नियमावली आणि अटींबाबत चर्चा करीत आहेत. सोबतच चिन्हांबाबतसुद्धा माहिती अवगत करून घेत आहेत. तहसील कार्यालयातसुद्धा दर्शनी भागासमोर चिन्हांची यादी लावण्यात आली असून, या चिन्हांवर उमेदवार बारकाईने नजर फिरवीत नेमके कोणते चिन्ह आपल्यासाठी योग्य राहील यावर चिंतन करीत आहेत.

वेगवेगळ्या चिन्हांवर लढावे लागेल

४८ वरून तब्बल १९० मुक्त चिन्हांची यादी या ग्रामपंचायत निवडणुकीत जाहीर करण्यात आली असून, वेगवेगळ्या चिन्हांवर उमेदवार रिंगणात असतील.

---

या नवीन चिन्हांची भर

निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जुन्या चिन्हांव्यतिरिक्त खालील नवीन चिन्हांची भर टाकली आहे. यामध्ये एअर कंडिशनर, सफरचंद, ऑटो रिक्शा, पांगुळ गाडा, मण्यांचा हार, पट्टा, बाकडे, सायकल पंप, दुर्बीण, बिस्कीट, होडी, पुस्तक, पेटी, ब्रेड टोस्टर, विटा, बादली, बस, गणकयंत्र, कॅन, ढोबळी मिरची, गालीचा, कॅरम बोर्ड, खटारा, फुलकोबी, सी.सी.टी.व्ही. कॅमेरा, साखळी, जाते, पोळपाट लाटणे, बुद्धिबळ, चिमणी, चिमटी(क्लिप), नारळाची बाग, रंगाचा ट्रे व ब्रश, संगणकाचा माऊस, संगणक, क्रेन, घन ठोकळा, हिरा, डिश अँटेना, दरवाजाची घंटी, दरवाजाची मूठ, ड्रिल मशीन, डंबेल्स, कानातले दागिने (कर्णफुले), लिफाफा, एक्सटेंशन बोर्ड, बासुरी, फुटबॉल, कारंजे, फ्राईंग पॅन, नरसाळे, ऊस, भेट वस्तू, आले, चष्मा, द्राक्षे, हिरवी मिरची, हात गाडी, हेड फोन, हेलिकॉप्टर, हेल्मेट, हॉकी, वाळूचे घड्याळ, पाणी गरम करण्याचे हिटर, फणस, चावी, भेंडी, लॅपटॉप, कडी, लाईटर, ल्यूडो, जेवणाचा डबा, काडेपेटी, माईक, मिक्सर, नेल कटर, गळ्यातील टाय, भुईमूग, पेर, वाटाणे, पेन ड्राईव्ह, फोन चार्जर, उशी, अननस, प्लास्टर थापी, जेवणाची थाळी, घागर, पंचिग मशीन, रॅकेट, फ्रिज, रूम कुलर, रबरी शिक्का, सेफ्टी पीन, शाळेची बॅग, स्कूटर, बोट, शटर, सितार, दोरी उडी, साबण, मोजे, सोफा, पाना, स्टॅप्लर, स्टेथोस्कोप, स्टम्प, सूर्यफूल, झोका, स्वीच बोर्ड, इंजेक्शन, टी. व्ही. रिमोट, टॅक्सी, चहाची गाळणी, दूरध्वनी, भाला फेकणारा, नांगर, चिमटा, दातांशा ब्रश, दातांची पेस्ट, ट्रॅक्टर, बिगुल, तुतारी, टाईप रायटर, टायर्स, छत्री, वॅक्युम क्लिनर, वॉल हूक, पाकीट, अक्रोड, कलिंगड, पाण्याची टाकी, विहीर, पवन चक्की, खिडकी, सूप, लोकरीचा गुंडा व सुई, आदी चिन्हांचा समावेश आहे.

- उमेदवारांकडून पाच चिन्हांबाबतचा उल्लेख असलेला अर्ज भरून घेतला जातो. त्यांच्या पसंतीक्रमानुसार चिन्ह वाटप केली जातात. एकाच प्रभागात चिन्हांची पसंती सारखीच असल्यास ज्या उमेदवाराचा अर्ज आधी आला त्याला चिन्ह निवडीबाबतचे प्रथम प्राधान्य दिले जाते.

टी.डी. लांजेवार नायब तहसीलदार (निवडणूक)