शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

धोत्रे, धानोरकर यांच्याविरुद्धच्या निवडणूक याचिका फेटाळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 22:36 IST

अकोला येथील भारतीय जनता पार्टीचे खासदार संजय धोत्रे व चंद्रपूर येथील काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांच्याविरुद्धच्या निवडणूक याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुणवत्ताहीन ठरवून फेटाळून लावल्या.

ठळक मुद्देहायकोर्टाचा निर्णय : याचिका गुणवत्ताहीन ठरवल्या

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : अकोला येथील भारतीय जनता पार्टीचे खासदार संजय धोत्रे व चंद्रपूर येथील काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांच्याविरुद्धच्या निवडणूक याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुणवत्ताहीन ठरवून फेटाळून लावल्या. न्यायमूर्ती मनीष पितळे यांनी सोमवारी हा निर्णय दिला. त्यामुळे दोन्ही खासदारांना मोठा दिलासा मिळाला.मतदार ज्ञानेश्वर सुलताने यांनी धोत्रे तर, वंचित बहुजन आघाडीचे राजेंद्र महाडोले यांनी धानोरकर यांच्या निवडणुकीला आव्हान दिले होते. अकोला व चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील निवडणुकीत दोषपूर्ण ईव्हीएम वापरण्यात आल्या. त्यामुळे झालेले मतदान व मोजण्यात आलेले मतदान यात फरक आढळून आला. त्याचा फायदा विजयी उमेदवारांना मिळाला. तसेच, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी भारतीय निवडणूक आयोगाद्वारे जारी करण्यात आलेल्या सूचनांचे व हॅन्डबुकमधील तरतुदींचे काटेकोर पालन केले नाही. परिणामी, दोन्ही मतदारसंघातील निवडणुका रद्द करून या ठिकाणी कायद्यानुसार नव्याने निवडणुका घेण्यात याव्यात असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते.याचिकाकर्त्यांच्या प्रत्युत्तरात दोन्ही खासदारांनी दिवाणी अर्ज दाखल करून याचिकांमधील दावे अमान्य केले. या याचिका दिवाणी प्रक्रिया संहितेतील आदेश ७ अंतर्गतच्या नियम ११ आणि लोकप्रतिनिधीत्व कायद्यातील कलम ८१, ८३, १०० व १०१ मधील तरतुदीत बसत नाहीत. याचिकाकर्त्यांनी खासदारांविरुद्ध काहीही आरोप केले नाहीत. त्यांनी कोणते गैरकृत्य केले याचा उल्लेख याचिकांत नाही. या याचिका दाखल करण्याकरिता कोणतेही कारण घडले नाही. त्यामुळे याचिका खारीज करण्याची विनंती खासदारांनी केली होती. धानोरकर यांच्यातर्फे अ‍ॅड. अनिल ढवस, धोत्रे यांच्यातर्फे अ‍ॅड. मुग्धा व रोहण चांदुरकर तर, निवडणूक आयोगातर्फे अ‍ॅड. नीरजा चौबे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयSanjay Dhotreसंजय धोत्रेSuresh Dhanorkarसुरेश धानोरकर