शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचे नवनिर्वाचित खासदार अनुप धोत्रे यांच्या निवडणुकीला हायकोर्टात आव्हान

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: July 16, 2024 20:13 IST

बारशीटाकळी तालुक्यातील मतदार गोपाल चव्हाण यांची याचिका

राकेश घानोडे, नागपूर: अकोला लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित खासदार अनुप धोत्रे यांच्या निवडणुकीविरुद्ध बार्शीटाकळी तालुक्यातील उमरदरी (पो. जनुना) येथील मतदार गोपाल चव्हाण यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. धोत्रे यांनी निवडणूक जिंकण्यासाठी भ्रष्ट व्यवहार केला. त्यामुळे त्यांची निवड रद्द करण्यात यावी, असे चव्हाण यांचे म्हणणे आहे.

लोकसभा निवडणूक लढणाऱ्या उमेदवाराने त्याच्या निवडणुकीवर झालेल्या खर्चाचा हिशेब सादर करणे बंधनकारक आहे. यासंदर्भात लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम ७७ मध्ये तरतूद करण्यात आली आहे. तसेच, उमेदवाराने निवडणुकीवर किती खर्च करायचा, याची मर्यादाही निश्चित असते. गेल्या लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय निवडणूक आयोगाने ९५ लाख रुपये खर्चाची मर्यादा निर्धारित केली होती. परंतु, धोत्रे यांनी या कायद्याचे पालन केले नाही. त्यांनी खर्चाची मर्यादा ओलांडली व एकूण खर्चाची माहितीही लपवून ठेवली.

धोत्रे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सादर केलेल्या खर्चाच्या माहितीमध्ये स्वत: ८१ लाख १७ हजार १०२ रुपये व भारतीय जनता पार्टीने ६ लाख ५५ हजार ८३० रुपये खर्च केल्याचे सांगितले आहे. हा एकूण खर्च ८७ लाख ७२ हजार ९३२ रुपये होतो. मात्र, भारतीय जनता पार्टीने धोत्रे यांच्या प्रचारासाठी प्रत्यक्षात १ कोटी २४ लाख ६० हजार ५९० रुपयांच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या. धोत्रे यांनी ही माहिती खर्चाच्या हिशेबात देणे आवश्यक होते, पण त्यांनी तसे केले नाही. त्यांनी ही माहिती दडवली. हा खर्च विचारात घेतल्यास त्यांनी खर्चाची मर्यादा ओलांडल्याचे स्पष्ट होते, असा दावा चव्हाण यांनी याचिकेत केला आहे. चव्हाणतर्फे ॲड. संदीप चोपडे कामकाज पाहणार आहेत.

टॅग्स :nagpurनागपूरMember of parliamentखासदार