शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नागपुरात गुंड, उपद्रवींची खैर नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 13:07 IST

नागपुरात निवडणुका शांततेत पार पडेल, असा विश्वास पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देपोलीस आयुक्तांचे आश्वासनकोणत्याही स्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज

नरेश डोंगरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निवडणुकीवर लक्ष ठेवून काही उपद्रवी मंडळी मुद्दामहून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात. हे ध्यानात ठेवून परिस्थिती कशी हाताळायची, यासंबंधाने पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण (इलेक्शन ट्रेनिंग) देण्यात आले आहे. उपद्रवींना वठणीवर आणण्यासाठी आणि कोणत्याही स्थितीचा सामना करण्यासाठी शहर पोलीस दल सज्ज आहे. त्यामुळे नागपुरात निवडणुका शांततेत पार पडेल, असा विश्वास पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी व्यक्त केला. नागपुरात दिग्गज नेत्यांमध्ये लोकसभेची लढत होत आहे. अनेक दिग्गज नेत्यांच्या नागपुरात जाहीर सभा पार पडणार आहेत. त्यामुळे नागपूर पोलिसांचीही बंदोबस्ताच्या माध्यमातून कसोटी लागली आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. उपाध्याय यांच्याशी लोकमतने बातचित केली.

निवडणुकीसाठी पोलिसांची काय तयारी?पोलिसांची अभूतपूर्व तयारी आहे. सहा हजार पोलीस, १००० अधिकारी, १५०० होमगार्डस् बंदोबस्तात तैनात आहेत. सीआयएसएफची एक तर एसआरपीएफच्या दोन कंपन्याही बंदोबस्तासाठी मदतीला आहेत. नागरिकांना आश्वस्त करण्यासाठी विविध भागात फ्लॅग मार्च काढण्यात येत आहे. रात्रंदिवस पोलिसांची गस्त सुरू आहे.

मोठ्या नेत्यांच्या सभांचे दडपण राहील?देशातील मोठ्या नेत्यांच्या बंदोबस्ताचा विशेष प्रोटोकॉल असतो. ज्या नेत्यांना स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपची सुरक्षा असते, अशा नेत्यांच्या सुरक्षा आणि सभांच्या बंदोबस्ताचे नियोजन ठरलेले आहे. विमानतळापासून ते ज्या ज्या ठिकाणी जातात, प्रचार सभा घेतात, त्या त्या मार्गावर, सभास्थळी, आजूबाजूच्या इमारतीवर पोलीस सुरक्षेचे कवच उभारण्यात येईल. आमची सर्व तयारी असल्याने प्रचार सभा, रोड शोचे फारसे दडपण वाटत नाही.

गुन्हेगारांचा बंदोबस्त कसा करणार?निवडणुकीदरम्यान जे असामाजिक तत्त्व गडबड करू शकतात, अशांची तसेच कुख्यात गुन्हेगारांची यादी तयार आहे. त्यांच्याविरुद्ध कारवाईदेखील सुरू झाली आहे. आतापर्यंत ५०५ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. ३० जणांना तडीपार करण्यात आले. १२ जणांवर एमपीडीए लावून त्यांना कारागृहात डांबण्यात आले आहे. दोन टोळ्यांवर मोक्का लावण्यात आला आहे. प्रत्येक गुन्हेगारावर नजर असून, त्याने थोडीही गडबड केली तर त्याच्या मुसक्या बांधून त्याला आतमध्ये डांबण्यात येणार आहे.

निवडणुकांमध्ये दारूला उधाण येते...!होय, खरे आहे. गुन्हेगारीचे, भांडणाचे मूळच दारूत आहे. त्यामुळे शहरातील १२५ ठिकाणी नाकेबंदी करून संशयित व्यक्ती आणि वाहनांची झाडाझडती घेतली जात आहे. आतापर्यंत २५० दारू विक्रेत्यांवर कारवाई करून लाखोंची दारू जप्त करण्यात आली आहे. मतदानाच्या पूर्वसंध्येपर्यंत ५०० पेक्षा जास्त दारू विक्रेत्यांना जेरबंद करणार.

झोपडपट्ट्यांमध्ये चहलपहल वाढली...!संवेदनशील भाग आणि झोपडपट्ट्यांवर विशेष लक्ष आहे. झोपडपट्टीत जाऊन आमिष दाखवून किंवा धाक दाखवून मते प्रभावित करण्याचा प्रयत्न करू पाहणाऱ्यांना तातडीने अटक करण्यासाठी झोपडपट्टींमध्ये सर्चिंग, कोम्बिंग केले जात आहे. पाचपेक्षा जास्त मंडळी रात्री ९ नंतर कोणत्या झोपडपट्टीत शिरत असेल तर त्यांना ताबडतोब ताब्यात घेतले जाईल. संशय आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.

पोलिसांच्या मनोबलाचे काय?पोलिसांचे मनोबल वाढविण्यासाठी शहरातील पाचही परिमंडळातील सर्वच पोलीस ठाण्यांना मी प्रत्यक्ष भेटी दिल्या. ठाणेदार आणि तेथील कर्मचाऱ्यांसोबत प्रत्यक्ष संवाद साधला आहे. त्यांच्या अडचणी, समस्या जाणून घेत त्या तातडीने दूर करण्यात आल्या असून, सर्वच प्रकारची साधनसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पोलिसांचे मनोबल उंचावलेले आहे. कुणाच्याही दडपणात किंवा धाकात येण्याचा प्रश्नच नाही. वरिष्ठ अधिकारी त्यांच्या कार्यकक्षेतील पोलीस ठाण्यातील स्थितीवर नजर ठेवून आहेत. त्यामुळे ही लोकसभा निवडणूक अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पडणार आहे.

टॅग्स :police commissioner office Nagpurपोलीस आयुक्त कार्यालय