शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक म्हणजे प्रतिमा प्रचाराचा व्यवसाय : लुडविग स्ट्रेईट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 22:41 IST

नवे तंत्रज्ञान लोकशाहीसाठी आव्हान ठरत असल्याचे मत बेलफिल्ड विद्यापीठ, जर्मनीचे तत्त्वज्ञ प्रा. लुडविग स्ट्रेईट यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे तंत्रज्ञान लोकशाहीसाठी आव्हान ठरत असल्याचे मत

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : २००० वर्षापूर्वी ग्रीकमध्ये लोकशाहीचा उदय झाला असे मानले जाते. त्या काळात तंत्रज्ञानाचा एवढा प्रभाव नव्हता, मात्र लोकशाहीची मूल्ये महत्त्वाची होती. आज मात्र लोकांना अपेक्षित असलेली लोकशाही जगात कुठेही दिसत नाही. निवडणूक प्रक्रिया आज केवळ एखाद्या पक्षाचा व त्यांच्या नेत्यांच्या प्रतिमा प्रचाराचा व्यवसाय झाला आहे. लोकांसाठी महत्त्वाचे असलेले मुद्दे सोडून स्वत:ची प्रतिमा उंचावण्यातच राजकारण्यांचा वेळ जातो. त्यासाठी तंत्रज्ञानाचा हवा तसा वापर व हवा तेवढा पैसा खर्च केला जातो. ही लोकशाहीची पडझड आहे. नवे तंत्रज्ञान लोकशाहीसाठी आव्हान ठरत असल्याचे मत बेलफिल्ड विद्यापीठ, जर्मनीचे तत्त्वज्ञ प्रा. लुडविग स्ट्रेईट यांनी व्यक्त केले.सेंट्रल इंडिया रिसर्च इन्स्टिट्यूट (सिरी) व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय  परिषदेत मार्गदर्शनासाठी आलेले प्रा. लुडविग यांनी लोकमतशी बोलताना आपले विचार व्यक्त केले. त्यांनी २००० ते २००१ या काळात विविध देशातील वर्तमान परिस्थितीच्या अभ्यासावरून आपले विचार मांडले. ‘कॉम्प्लेक्सीटी, अ‍ॅक्सेलरेशन, ग्लोबलायझेशन : चॅलेंजेस फॉर डेमोक्रसी’ हा त्यांच्या भाषणाचा विषय होता. लोकशाहीचा उदय झाला तेव्हा प्रक्रिया हळुवार चालत होत्या. लोकांकडे वेळ होता. मात्र पुढे राष्ट्रांमधील तणाव वाढत गेला, युद्ध होत गेले व त्यातून तंत्रज्ञानाची गरज भासू लागली. नवनवे तंत्रज्ञान विकसित होत गेले. आज तंत्रज्ञानाने जग एकमेकांशी जुळले, मात्र यातून गुंतागुंत वाढीला लागली. जग प्रचंड गतिमान झाले असून कुणाकडे ही गुंतागुंत सोडविण्यासाठी वेळ नाही. सरकारचेही तसेच. आधी आर्थिक धोरण म्हणजे भविष्याची गुंतवणूक असायची. आज दर महिन्याला आर्थिक धोरणे बदलली जातात. यातून आर्थिक मंदीसारखे प्रश्न सातत्याने निर्माण होत आहेत. यालाच अ‍ॅक्सेलरेशन म्हणतात. त्यातून जगभरात समस्या निर्माण केल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.लोकांचे सरकार हा आभास असल्यासारखे वाटते. लोकशाहीच्या देशातील लोक नाखूश आहेत, कारण ते योग्य पद्धतीने चालविली जात नाही. चीनमध्ये लोकशाही नाही, मात्र तो देश विकास करीत असून गरिबी कमी झाली आहे. सिंगापूरचा अनुभवही तसाच आहे. लोकांना हुकूमशाही ऐवजी लोकशाहीच महत्त्वाची वाटते, मात्र निवडणूक प्रक्रिया बदलावी असा विचार समोर येत आहे. त्यामुळे लोकशाही एक मोठा बदल घडण्याची वाट पाहतेय, असे वाटते. भविष्यात याचे परिणाम दिसतील, असे मत त्यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठnagpurनागपूर