शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक खर्चात गडकरी आघाडीवर, पटोले दुसऱ्या क्रमांकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 01:15 IST

नागपूर लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक खर्च भाजप उमेदवार नितीन गडकरी यांनी केला. त्यांच्या पाठोपाठ काँगे्रस उमेदवार नाना पटोले यांचा क्रमांक आहे. दोघांच्या मतांमधील अंतर दोन लाखांच्यावर असले तरी खर्चातील तफावत मात्र केवळ ८० हजाराच्या घरात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक खर्च भाजप उमेदवार नितीन गडकरी यांनी केला. त्यांच्या पाठोपाठ काँगे्रस उमेदवार नाना पटोले यांचा क्रमांक आहे. दोघांच्या मतांमधील अंतर दोन लाखांच्यावर असले तरी खर्चातील तफावत मात्र केवळ ८० हजाराच्या घरात आहे.लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदाची लोकसभा निवडणूक आतापर्यंतची सर्वाधिक खर्चिक असल्याचे बोलले जाते. नागपूर लोकसभा निवडणुकीत ३० उमेदवार रिंगणात होते. यातील २९ उमेदवारांनी निवडणूक विभागाला खर्चाची माहिती दिली आहे. यानुसार सर्व उमेदवारांनी मिळून १ कोटी ७५ लाख १७ हजारांवर खर्च केला. भाजपचे उमेदवार गडकरींनी निवडणूक विभागाला दिलेल्या माहितीनुसार त्यांनी निवडणुकीत एकूण ४४ लाख ८८ हजार ०४१ रुपये खर्च केले तर काँग्रेसचे नाना पटोले यांनी ४४ लाख ३ हजार ५१५ रुपये खर्च केले. त्या पाठोपाठ बसपाचे मोहम्मद जमाल यांनी ३१ लाख ७५ हजार ९३४ रुपये तर वंचित बहुजन आघाडीचे सागर डबरासे यांनी २५ लाख ३९ हजार ५३६ रुपये खर्च केला आहे. बीआरएसपी अ‍ॅड. सुरेश माने यांनी १० लाख ३६ हजार ७७० रुपये खर्च केले.रामटेकमध्ये गजभिये आघाडीवररामटेक लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार कृपल तुमाने विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे किशोर गजभिये यांचा पराभव केला. परंतु निवडणुकीत खर्च करण्यात मात्र गजभिये आघाडीवर राहिले. त्यांनी ३४ लाख ६१ हजार रुपये खर्च केले तर तुमाने यांनी २२ लाख ७७ हजार ३९९ रुपये खर्च केले. बसपाचे सुभाष गजभिये तिसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यांनी ७ लाख ३ हजार ६२६ रुपये खर्च केले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीNana Patoleनाना पटोलेElectionनिवडणूक