शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
4
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
5
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
6
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
7
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
8
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
9
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
10
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
11
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
12
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
13
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
14
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
15
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
16
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
17
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
18
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
19
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
20
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?

निवडणूक विभाग तीन दिवसापासून जागाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 21:35 IST

लोकशाहीमध्ये निवडणूक ही अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया राबवणे हे सर्वात जोखमीचे कार्य समजले जाते. त्यामुळेच निवडणूक विभागासह संपूर्ण जिल्हा प्रशासन गेल्या काही दिवसंपासून दिवसरात्र राबत आहेत. तीन दिवसांपासून तर जिल्हाधिकाऱ्यांपासून तर कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वच २४ तास काम करीत आहे. मतदानाच्या दिवशी तर निवडणूक विभागच नव्हे तर संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयच जागे होते, हे विशेष.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वच दिवस-रात्र राबताहेतमतदानाच्या दिवशी संपूर्ण रात्र काढली जागून

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकशाहीमध्ये निवडणूक ही अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया राबवणे हे सर्वात जोखमीचे कार्य समजले जाते. त्यामुळेच निवडणूक विभागासह संपूर्ण जिल्हा प्रशासन गेल्या काही दिवसंपासून दिवसरात्र राबत आहेत. तीन दिवसांपासून तर जिल्हाधिकाऱ्यांपासून तर कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वच २४ तास काम करीत आहे. मतदानाच्या दिवशी तर निवडणूक विभागच नव्हे तर संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयच जागे होते, हे विशेष.निवडणुकीची आचारसंहिता सुरु झाली. तेव्हापासून निवडणूक विभागाच्या कामाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. परंतु मंगळवारपासून निवडणूक विभागाची धावपळ वाढली. साहित्य वाटपाच्या दिवसापासून जागरण सुरु झाले. मतदानाचा दिवस तर सर्वात महत्त्वाचा ठरला. नागपूर लोकसभेतील २०१६ आणि रामटेक येथील २३६४ असे एकूण ४४२९ मतदान केंद्रातील मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सायंकाळी सर्व ईव्हीएम मशीन सील करून ते आपापल्या विधानसभानिहाय स्ट्राँग रुममध्ये आणण्यात आले. येथे प्रत्येक ईव्हीएमची मोजणी झाली. किती बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट नेण्यात आले, त्या प्रत्येकाची मोजणी झाली. किती खराब झाले. त्या परत आलेत का? या सगळ्यांची बूथनिहाय मोजणी केली. त्यानंतर प्रत्येक मशीन विधानसभानिहाय कंटेनरमध्ये सीआयपीएफच्या सुरक्षेत कळमना येथील स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित पोहोचवण्यात आले. यासंपूर्ण प्रक्रियेत जिल्हाधिकाऱ्यांपासून तर उपजिल्हा निवडणूक अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, सर्व कक्ष अधिकारी कर्मचाऱ्यांचे जागरण होत आहेच. परंतु निवडणूक विभागात काम करणारे अधिकारी कर्मचारीही रात्रभर जागत आहेत. निवडणूक विभागातील गुरुवारी कामावर आलेले अनेक अधिकारी तर आज शुक्रवारी दुपारपर्यंत कार्यालयातच होते, हे विशेष.आमचे अधिकारी व कर्मचारी सातत्याने राबत आहे. त्यांची झोप झालेली नाही. मतदानाचे साहित्य वाटपापासून तर त्यांच्यावर कामाचा अधिकच ताण आहे. आज थोडे कामापासून मोकळे झाले. त्यांनी पुरेशी झोप घेण्याची गरज आहे. त्यासाठी त्यांना सवलत दिली जाईल.अश्विन मुदगलजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, तथा जिल्हाधिकारी३८ ठिकाणी सुरु होते ६ नंतरही मतदाननिवडणूक विभागाने आधीच जाहीर केल्याप्रमाणे सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत मतदान चालणार होते. परंतु ६ वाजता मतदान केंद्रावर रांगेत असलेली शेवटची व्यक्ती मतदान करेपर्यंत मतदानाची प्रक्रिया चालणार होती. त्यानुसार नागपूर शहरात एकूण ३८ ठिकाणी सायंकाळी ६ नंतरही लोकं रांगेत होते. त्यांची एकूण मतदानाची प्रक्रिया ७ ते ७.३० पर्यंत चालली.विधानसभानिहाय ६ नंतर सुरु असलेले मतदान केंद्रविधानसभा मतदान केंद्रउत्तर नागपूर १३पूर्व नागपूर ४मध्य नागपूर ३दक्षिण नागपूर ९पश्चिम नागपूर ४दक्षिण-पश्चिम नागपूर - ५----------------------------एकूण ३८

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnagpur-pcनागपूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019