आॅनलाईन लोकमतगडचिरोली- गोंदियाकडून येणाऱ्या गोंदिया-बल्लारशाह पॅसेंजर गाडीने प्रवास करत असलेली एक वृद्ध महिला अर्जुनी तालुक्यातील अरुणनगर येथे उतरताना तोल जाऊन पडली व रेल्वेखाली आल्याने तिला आपला डावा पाय गमावावा लागल्याची घटना येथे शुक्रवारी दुपारी १.३० च्या सुमारास घडली.सौ. वच्छला विश्वनाथ बडोले (वय ७३) असे या महिलेचे नाव असून तिला देसाईगंज येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही महिला भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातल्या बारवा येथील रहिवासी असून ती आपल्या वृद्ध पतीसोबत प्रवास करीत होती.तिला रुग्णालयात नेण्याकरिता रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने देसाईगंजचे पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांनी व्यवस्था करून तिला रुग्णालयात दाखल केले. या महिलेला रेल्वे विभागाकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन स्टेशन व्यवस्थापक पी.एस. भोंडे यांनी दिले.
रेल्वेतून खाली उतरताना वृद्ध महिलेने गमावला डावा पाय
By admin | Updated: May 26, 2017 15:28 IST