शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
2
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
3
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
4
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
5
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
6
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
7
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
8
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
9
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
10
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
11
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
12
"तुमचं माझ्यावरचं, माझं तुमच्यावरचं प्रेम 'अक्षय' राहो..", प्राजक्ता माळीने केली नव्या सिनेमाची घोषणा
13
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
14
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
15
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
16
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
17
आजारपणात या अभिनेत्रीच्या नवऱ्याने सोडली साथ, सलमान खान ठरला देवदूत, आता भाईजानबद्दल म्हणाली...
18
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा
19
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवीन गुरू? BCCI कडून हालचालींना वेग
20
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन

नागपुरात आठवीच्या विद्यार्थ्याने रचले अपहरण नाट्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2018 12:55 AM

आठवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने स्वत:चे अपहरण नाट्य रचले. त्याच्या या कथित अपहरणात त्याचे दोन बालमित्रही सहभागी झाले. या तिघांनी शनिवारी दुपारी तब्बल तीन तासापर्यंत शहर पोलीस दलाची भंबेरी उडवून दिली.

ठळक मुद्देबालमित्रांचाही सहभाग : शहर पोलिसांची उडाली भंबेरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आठवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने स्वत:चे अपहरण नाट्य रचले. त्याच्या या कथित अपहरणात त्याचे दोन बालमित्रही सहभागी झाले. या तिघांनी शनिवारी दुपारी तब्बल तीन तासापर्यंत शहर पोलीस दलाची भंबेरी उडवून दिली.मेकोसाबाग, जरीपटक्यातील दोन १२ वर्षीय मुले आशू (नाव काल्पनिक, वय १४) याच्या घरी शनिवारी सकाळी ११.३० च्या सुमारास आली. पांढऱ्या व्हॅन(कार)मध्ये आलेल्या काही जणांनी आशूला कारमध्ये कोंबले. आम्ही त्यांच्याकडे दगड भिरकावला म्हणून ते आशूलाच घेऊन पळून गेले, अशी माहिती त्यांनी आशूच्या आईवडिलांना दिली. मुलाचे अपहरण झाल्याच्या वृत्ताने हादरलेल्या पालकांनी जरीपटका ठाणे गाठून तक्रार नोंदवली. अधिवेशनाच्या निमित्ताने शहरभर मोठा पोलीस ताफा असताना एका शाळकरी मुलाचे अपहरण झाल्याची तक्रारवजा माहिती मिळाल्याने पोलिसांचे धाबे दणाणले. ठाणेदार पराग पोटे यांनी तातडीने नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून शहर तसेच आजूबाजूच्या पोलिसांना ही माहिती कळविली. त्यानंतर प्रत्यक्षदर्शी मुलांना घेऊन ते कथित घटनास्थळाकडे निघाले. तेथे हे दोघे वगळता कुणीच अशी घटना घडल्याबाबत दुजोरा देत नव्हते. त्यामुळे जरीपटकाच नव्हे तर अवघे शहर पोलीस दल कथित अपहरणकर्ते आणि पांढºया व्हॅनचा शोध घेण्यासाठी धावपळ करू लागले. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना हे कळताच त्यांनीही जरीपटका पोलीस ठाणे गाठले. दुपारचे २ वाजले मात्र कथित अपहरणकर्ते आणि आशू सापडता सापडेना. आशूचे नातेवाईक, ही घटना सांगणारी ती दोन मुले, त्यांचे नातेवाईक आणि आजूबाजूची मंडळी या प्रकरणावर पोलीस ठाण्यात मंथन करीत असताना अचानक आशूच्या वडिलांना त्यांच्या भाच्याचा गोंदियाहून फोन आला. आशू माझ्यासोबत आहे. त्याला मी रेल्वेस्थानक गोंदिया येथे उतरवून घेतल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी ‘त्या दोघांना’ बोलते केले. पुढे आलेली माहिती पोलिसांसकट साºयांनाच चाट पाडणारी होती.निरागसता अन् गंभीरपणा चक्रावून टाकणाराआशूचे शाळा आणि अभ्यासात फारसे मन लागत नसल्यामुळे त्याच्या आईने शुक्रवारी त्याची खरडपट्टी काढली. आईकडून मार मिळाल्याने आशू कमालीचा अस्वस्थ झाला. रात्री झोपेतच त्याने स्वत:च्या कथित अपहरणाचा कट रचला. सकाळी झोपेतून उठल्यानंतर त्याने त्याच्या दोन बालमित्रांना या अपहरण नाट्यात सहभागी करून घेतले. तिघेही सायकलने रेल्वेस्थानकावर पोहचले.आशूने गोंदियाची रेल्वेगाडी पकडली तर, हे दोघे घराकडे परतले. आशूने सांगितल्याप्रमाणे त्यांनी आशूच्या आईवडिलांना कथित अपहरणाची कथा सांगितली. पोलिसांनाही अपहरण नाट्य कसे घडले ते सांगत होते. पोलिसांशी बोलताना ते कधी घाबरल्यासारखे करीत होते. कधी गंभीरपणे तर कधी निरागसपणे पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरे देत होते. अडीच-तीन तास ते खोटे बोलत आहेत, असा साधा संशयही त्यांनी पोलिसांना येऊ दिला नाही.साऱ्यांचाच जीव पडला भांड्यातआशूच्या वडिलांना मात्र तो घरून पळून गोंदियाला गेला असावा, असा सुरुवातीपासूनच संशय होता. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे तक्रार करण्यापूर्वीच त्यांच्या गोंदियातील भाच्याला फोन करून रेल्वेस्थानकावर थांबायला सांगितले होते. त्यानुसार, भाचा रेल्वेस्थानकावर थांबला अन् आशू रेल्वेत दिसताच त्याने त्याला तेथे उतरवून घेत त्याच्या वडिलांना फोन केला. आशूने स्वत:च त्याच्या अपहरणाचे नाट्य रचले होते अन् त्यात त्याचे दोन बालमित्रही सहभागी होते, हे उघड झाल्यानंतर पालकांसह पोलिसांचाही जीव भांड्यात पडला.

टॅग्स :Crimeगुन्हाKidnappingअपहरण