शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

यंदा ‘कोजागिरी’ला जुळून येत आहेत आठ दुर्लभ याेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2022 19:04 IST

यंदा कोजागिरीला ग्रह-नक्षत्रांचे आठ दुर्लभ योग जुळून येत असल्याने या दिवसाचे महत्त्व विशेष ठरणार असल्याची माहिती ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी दिली.

ठळक मुद्दे२७.५ वर्षानंतर शनी करणार मकर राशीतून भ्रमण तर ११ वर्षांनी मीन राशीतून गुरूचे भ्रमण

नागपूर : रविवारी अश्विन पौर्णिमा असून या दिवशी कोजागिरी पौर्णिमा म्हणून साजरी करण्याची प्राचीन परंपरा आहे. याच दिवसापासून शरद ऋतूस प्रारंभ होत असल्याने या दिवसाला शरद पौर्णिमा, असेही म्हटले जाते. यंदा या दिवशी ग्रह-नक्षत्रांचे आठ दुर्लभ योग जुळून येत असल्याने या दिवसाचे महत्त्व विशेष ठरणार असल्याची माहिती ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी दिली.

कोजागर्तीला रविवारी बुध-शुक्र युतीमुळे लक्ष्मीनारायण योग, सूर्य-बुध युतीमुळे बुधादित्य योग, चंद्र-गुरू युतीमुळे गजकेसरी योग होत असून, बुध-शनी-गुरू हे तीन ग्रह आपापल्या स्वराशित असल्यामुळे भद्र नामक पंचमहापुरुष योग, असे आठ योग जुळून येत आहेत. विशेष म्हणजे या दिवशी तब्बल २७.५ वर्षांनंतर शनीचे स्वराशीतून म्हणजेच मकर राशीतून भ्रमण होत असून ११ वर्षांनी गुरू मीन या स्वराशीतून भ्रमण करणार आहे. या सगळ्या दुर्लभ योगांमुळे हा दिवस अतिशय शुभ मानला जात असल्याचे डॉ. अनिल वैद्य यांनी सांगितले.

रात्री ८ ते ११ शुभ प्रभाव

ज्योतिषशास्त्रानुसार हा दिवस दुपारी २.५९ मिनिटांनंतर अत्यंत शुभ असणार आहे. रात्री ८ ते ११ वाजताच्या सुमारास चंद्रमा मोठ्या प्रमाणात अमृतवर्षाव करणार असून चंद्र व शुक्र यांचा मोठ्या प्रमाणात शुभ प्रभाव वातावरणात राहणार असल्याने, यावेळी आरोग्यवर्धक दूध ग्रहण करणे लाभदायक ठरणार आहे.

...............

टॅग्स :cultureसांस्कृतिक