शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

मेयोतील डीनच्या नावाने मागितली आठ लाखांची लाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 23:31 IST

वाहनचालकाची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या (मेयो) डीनच्या नावाने आठ लाख रुपयांची लाच मागणाऱ्या एका तंत्रज्ञाला (टेक्निशियन) एसीबीने सोमवारी सायंकाळी जेरबंद केले.

ठळक मुद्देएसीबीने बांधल्या टेक्निशियनच्या मुसक्या : वैद्यकीय वर्तुळात खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाहनचालकाची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या (मेयो) डीनच्या नावाने आठ लाख रुपयांची लाच मागणाऱ्या एका तंत्रज्ञाला (टेक्निशियन) एसीबीने सोमवारी सायंकाळी जेरबंद केले. २० हजारांचे टोकन घेताना एसीबीच्या पथकाने त्याच्या मुसक्या बांधल्यानंतर वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली.जावेद पठाण हमिद पठाण (वय ३१) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी जावेद मेयोतील ट्रामा सेक्शनमध्ये टेक्निशियन आहे. त्याला एसीबीच्या जाळ्यात अडकवणारा ऑटोचालक आहे. तो ताजबाग परिसरात एकमिनार मशिदीजवळ राहतो. दोन महिन्यापूर्वी त्याची आरोपी जावेदसोबत ओळख झाली. ऑटो चालवून फारशी मिळकत होत नाही, काही चांगला कामधंदा असेल तर सांग, असे ऑटो चालकाने जावेदला म्हटले होते. १९ सप्टेंबरला जावेदने त्याला फोन केला. इंदिरा गांधी रुग्णालय नागपूर येथे चालक या पदाकरिता जागा निघाल्या आहेत. येथील अधिष्ठाता (डीन) डॉ. अजय केवलिया आणि सहारे बाबूंसोबत ओळख आहे. या दोघांचे पैशाचे सर्व लेनदेनचे व्यवहार आपणच सांभाळतो, असे सांगून तुला पक्की नोकरी लावून देतो, त्यासाठी आठ लाख रुपये लाच द्यावी लागेल, असे जावेद म्हणाला. एवढी रक्कम कुठून आणू, अशी विचारणा केली असता काहीही विक असा सल्ला आरोपी जावेदने त्याला दिला. जावेदचा सल्ला जिव्हारी लागल्याने ऑटोचालकाने एसीबीचे कार्यालय गाठले. त्याने तक्रार नोंदवताच पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, अतिरिक्त अधीक्षक राजेश दुद्धलवार यांनी त्या तक्रारीची शहानिशा करवून घेतली. त्यानंतर सापळा लावून कारवाईचे आदेश दिले.बातचित पक्की, टोकनची वाट!नोकरीची हमी देतानाच बातचित पक्की करण्यासाठी जावेदने २० हजारांचे टोकन मागितले. ही रक्कम घेऊन ऑटोचालक आणि त्याच्या सोबत एसीबीचे पथक जावेदमागे मंगळवारी दिवसभर फिरले. सायंकाळी ६.३० च्या सुमारास ताजबाग परिसरात जावेदने लाचेची रक्कम स्वीकारली आणि एसीबीच्या पथकाने त्याच्या मुसक्या बांधल्या. एसीबीने पकडल्याचे लक्षात येताच जावेदने सुटकेसाठी आरडाओरड केली. मात्र, त्याचा फायदा झाला नाही. पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, अतिरिक्त अधीक्षक राजेश दुद्धलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश लबडे, हवलदार प्रवीण पडोळे, नायक प्रभाकर बेले, मंगेश कळंबे, शालिनी जांभूळकर, हवालदार चौधरी यांनी ही कामगिरी बजावली.‘त्यांच्या’ही भूमिकांची तपासणी !या कारवाईने वैद्यकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, जावेद पठाण ज्या पद्धतीने वारंवार मेयोचे अधिष्ठाता आणि अन्य एकाचे नाव घेत होता, तो त्याचा आत्मविश्वास एसीबीच्या अधिकाऱ्यांना चक्रावून टाकणारा आहे. त्याचमुळे ज्यांची नावे घेतली, त्यांचीही आम्ही या लाच प्रकरणात भूमिका तपासत असल्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजेश दुद्धलवार यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :indira gandhi medical college, Nagpurइंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग