लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्यपालांचे निवासस्थान असलेल्या राजभवन परिसरात सोमवारी सायंकाळी साडे आठ फूट लांब धामण (साप) सापडली. सर्पमित्राच्या साहाय्याने ही धामण पकडण्यात आली. या घटनेने काही वेळासाठी खळबळ माजली होती.पावसाळी अधिवेशन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. प्रशासनातर्फे प्रत्येक दृष्टीने तयारी केली जात आहे. यातच पावसाच्या दिवसात साप निघण्याची शक्यता लक्षात घेता, राजभवन, विधानभवन, आमदार निवास, नागभवन, १६० खोल्यांचे गाळे आदी परिसरात साप असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी)आणि वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आतापासूनच सर्प मित्राच्या साहाय्याने साप पकडण्यासाठी सर्च मोहीम राबविली जात आहे. आरएफओ निंबाळकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता चंद्रशेखर गिरी यांच्या नेतृत्वात सर्पमित्र डंभारे हे या मोहिमेत सहभागी आहेत. सोमवारी याची सुरुवात रविभवन येथून करण्यात आली. दरम्यान रविभवन येथे साप शोधत असतानाच राजभवन येथे धामण दिसून आल्याचे गिरी यांना फोनवर कळले. तिघेही तातडीने राजभवनकडे निघाले. राज्यपालांच्या बंगल्याच्या परिसरातच ही धामण होती. ती डंभारे यांनी पकडली. ही धामण साडे आठ फूट लांब आहे. वन विभागातर्फे या कारवाईचा पंचनामा करण्यात आला. निंबाळकर यांच्यानुसार धामण विषारी नाही. ती अतिशय चपळ असते. पंचनामा झाला असून तिला हिंगणा वनपरिक्षेत्रातील मोहगाव झिल्पी येथे सोडण्यात येईल.सर्पमित्राद्वारे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणअधिवेशनकाळात काम करीत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सापाविषयी प्रशिक्षण देण्यात आले आहे. सर्पमित्र डंभारे यांनी या सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले. यात साप दिसला तर न घाबरला काय केले पाहिजे. त्याला व स्वत:ला इजा होणार नाही, याची कशी खबरदारी घ्यावी, याचेही प्रशिक्षण देण्यात आले आहे.
नागपुरातील राजभवनात सापडली साडे आठ फुटी धामण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 20:33 IST
राज्यपालांचे निवासस्थान असलेल्या राजभवन परिसरात सोमवारी सायंकाळी साडे आठ फूट लांब धामण (साप) सापडली. सर्पमित्राच्या साहाय्याने ही धामण पकडण्यात आली. या घटनेने काही वेळासाठी खळबळ माजली होती.
नागपुरातील राजभवनात सापडली साडे आठ फुटी धामण
ठळक मुद्देसाप पकडण्यासाठी सर्च मोहीम : वन विभाग आणि पीडब्ल्यूडी विभागाची संयुक्त कारवाई