शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विमानतळावरून आठ विमानांची उड्डाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 21:29 IST

लॉकडाऊनपूर्वी देशाच्या विविध भागातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर जवळपास ४० विमानांची ये-जा होती. पण लॉकडाऊन आणि अनलॉकमध्ये उड्डाणांची संख्या कमी झाली आहे. मंगळवारी तीन कंपन्यांच्या आठ विमानांनी विमानतळावरून उड्डाण केले.

ठळक मुद्देअनेक दिवसांपासून पुरेशा प्रवासी संख्येअभावी उड्डाणे होताहेत रद्द

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनपूर्वी देशाच्या विविध भागातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर जवळपास ४० विमानांची ये-जा होती. पण लॉकडाऊन आणि अनलॉकमध्ये उड्डाणांची संख्या कमी झाली आहे. मंगळवारी तीन कंपन्यांच्या आठ विमानांनी विमानतळावरून उड्डाण केले. विमानांच्या दररोज बदलत्या वेळापत्रकामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.एरवी नागपूर विमानतळावरून मुंबई आणि दिल्ली या हवाई मार्गावर सर्वाधिक गर्दी असते. परंतु, गेल्या अनेक दिवसांपासून या मार्गावरील विमानांची उड्डाणे रद्द झाली आहेत. परिणामत: हवाई वाहतूक कमी झाली आहे. पुढील काही दिवसांत यात वाढ होण्याची शक्यता कमी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दररोज मुंबई आणि दिल्लीला जाणारे एअर इंडियाचे विमान आता आठवड्यात तीन दिवस सोमवार, गुरुवार आणि शनिवारी दिल्लीला जात आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता देशांतर्गत विमान रद्द करण्याची शृंखला येणारे काही आठवडे कायम राहणार आहे. याचा जोरदार फटका ग्राहकांना तसेच एअरलाईन्स कंपन्यांना बसणार आहे. क्वारंटाईनच्या भीतीने अनेकजण विमानाऐवजी रस्ता मार्गाने प्रवास करीत आहेत. त्यामुळे पुरेशा प्रवासी संख्येअभावी अनेकदा विमान फेरी रद्द करावी लागत आहे. २५ मार्चपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा रद्द करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय मार्गावर केवळ कार्गो विमानांनी उड्डाण केले आहे.मंगळवारी इंडिगोचे सहा, गो-एअर आणि स्पाईज जेटचे प्रत्येकी एक अशा एकूण आठ विमानांनी उड्डाण भरले. गो-एअरचे नागपूर-मुंबई विमान सकाळी ८.४० वाजता, इंडिगोच्या सहा उड्डाणांमध्ये दोन विमाने नागपूर-पुणे, दोन नागपूर-मुंंबई, दोन नागपूर-दिल्ली आणि स्पाईस जेटचे एक विमान दिल्लीकरिता होते.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूरAir Indiaएअर इंडिया