शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  आठ विमाने उशिरा पोहोचली, चक्रीवादळामुळे कोलकाताची उड्डाणे रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 00:38 IST

. शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आठ विमाने उशिरा पोहोचली. त्यामुळे प्रवाशांना ताटकळत राहावे लागले.

ठळक मुद्देगो एअरच्या विमानाला तीन तास विलंब

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : देशाच्या अन्य शहरांमधून नागपुरात विविध कंपन्यांच्या विमानांच्या लेटलतिफीचा क्रम सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीत धुके असल्याने अनेक विमाने नागपुरात उशिरा आली होती. शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आठ विमाने उशिरा पोहोचली. त्यामुळे प्रवाशांना ताटकळत राहावे लागले.याशिवाय बंगालच्या उपमहासागरात ‘बुलबुल’ चक्रीवादळामुळे कोलकाता विमानतळावरील सर्व विमानांचे उड्डाण शनिवारी सायंकाळी ६ ते सकाळी ६ पर्यंत रद्द करण्यात आले आहे. त्याचा फटका प्रवाशांना बसला. नागपुरातून कोलकाताला जाणारे इंडिगोचे विमान आणि कोलकाताहून नागपुरात येणारी दोन विमाने रद्द करण्यात आली आहेत.गो एअरचे जी८२८३ पुणे-नागपूर विमान सकाळी ८.५५ ऐवजी तब्बल ३ तास उशिरा ११.५५ वाजता आणि एअर इंडियाचे एआय६२९ मुंबई- नागपूर विमान रात्री ८.३५ मिनिटांऐवजी दोन तास उशिरा पोहोचले. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. एअर इंडियाच्या काऊंटरवर विचारपूस केली असता, काहीही उत्तर मिळाले नाही.इंडिगोच्या ६ई५६३ चेन्नई-नागपूर विमान १ तास ५ मिनिटे उशिरा दुपारी १ ऐवजी २.०५ वाजता, इंडिगोचे मुंबई-नागपूर विमान ३५ मिनिटे विलंबाने दुपारी १.४० वाजता, इंडिगोचेच ६ई४०३ मुंबई-नागपूर विमान ३३ मिनिटे उशिरा सायंकाळी ६.०३ वाजता, गो एअरचे दिल्ली-नागपूर विमान ३२ मिनिटे विलंबाने रात्री ९.२७ वाजता, इंडिगोचे ६ई५३७७ मुंबई-नागपूर विमान ३० मिनिटे उशिराने रात्री १०.१५ वाजता आणि गो एअरचे जी८ ७१२ बेंगळुरू-नागपूर विमान ३० मिनिटे उशिरा मध्यरात्रीनंतर आले. याशिवाय गो एअरचे जी८१४१ नागपूर-मुंबई विमान दुपारी ३ तास उशिरा विलंबाने मुंबईला पोहोचल्याची माहिती आहे.

टॅग्स :IndigoइंडिगोDr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर