शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

कोविड मृतदेहासाठी आठ फूट खोल खड्डा आवश्यक : मनीष श्रीगिरीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 18:41 IST

कोरोनाबाधित मृतदेहाची विल्हेवाट दहन प्रक्रियेने केल्यास संसर्गाचे सर्व स्त्रोत जळून नष्ट होतात. परंतु कुठल्या धर्माला दहन करण्यास आपत्ती असल्यास मृतदेहाचे योग्य काळजीपूर्वक दफन करणे आवश्यक आहे. दफन करतेवेळेस खड्डा कमीत कमी सात-आठ फूट खोल असावा.

ठळक मुद्देदहन प्रक्रियेने विल्हेवाट केल्यास संसर्गाचे स्त्रोत जळून नष्ट होतात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाबाधित मृतदेहाची विल्हेवाट दहन प्रक्रियेने केल्यास संसर्गाचे सर्व स्त्रोत जळून नष्ट होतात. परंतु कुठल्या धर्माला दहन करण्यास आपत्ती असल्यास मृतदेहाचे योग्य काळजीपूर्वक दफन करणे आवश्यक आहे. दफन करतेवेळेस खड्डा कमीत कमी सात-आठ फूट खोल असावा. हा खड्डा नदी किंवा पाण्याच्या स्त्रोतांपासून लांब असावा. मृतदेह हा ‘बॉडीबॅग’मध्येच असावा. शक्यतो शवपेटीचा वापर करावा, अशी माहिती ‘एम्स’ नागपूरच्या न्याय चिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. मनीष श्रीगिरीवार यांनी दिली.विदर्भात दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. परिणामी, मृत्यूचा आकडाही वाढला आहे. यामुळे ‘कोविड-१९’च्या पार्श्वभूमीवर कोरोनाबाधित मृतदेहाचे व्यवस्थापन करणे हे मोठे आव्हान ठरले आहे. याबाबत डॉ. श्रीगिरीवार यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. ते म्हणाले, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाने कोरोनाबाधित मृतदेहाच्या विल्हेवाटीबाबत मार्गदर्शिका निश्चित केल्या आहेत. तरीही विविध गैरसमज आहेत, तसेच भीतीपोटी कोरोनाबाधित मृतदेहाची अयोग्य पद्धतीने विल्हेवाट होत असल्याचेही समोर आले आहे. यामुळे जनजागृतीसाठी तसेच जनमानसातील विविध शंका आणि गैरसमज दूर होणे आवश्यक आहे. -मृतदेहामुळे कोरोनाचे संक्रमण शक्यडॉ. श्रीगिरीवार म्हणाले, कोरोनाबाधित मृतदेहातील रक्त व इतर स्त्रावामधून विषाणूद्वारे संसर्ग होण्याची शक्यता असते. मृतदेहाच्या कपड्यांमुळे संक्रमण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून कोरोनाबाधित मृतदेह व्यवस्थित न हाताळल्यास संक्रमण होऊ शकते .-तोंड, कान व नाक कापसाच्या बोळ्याद्वारे बंद करावेमृतदेहाचे तोंड, नाक व कान सोडियम हायपोक्लोराईड जंतुनाशक द्रवाच्या कापसाच्या बोळाद्वारे बंद करावे. मृतदेहाला ज्या बॉडीबॅगमध्ये ठेवले जाते त्या बॅगला बाहेरून सोडियम हायपोक्लोराईडव्दार निर्जंतुकीकरण करणे आवश्यक असते. मृतदेहास हाताळताना नेहमी ग्लोव्ह्ज आणि सर्जिकल मास्कचा वापर करावा. तसेच हाताची स्वच्छता राखण्याकरिता साबणाचा वारंवार उपयोग करावा. ज्या वाहनाद्वारे मृतदेहास हलविले, त्या वाहनाचे सोडियम हायपोक्लोराईडव्दारे निर्जंतुकीकरण करण्यात यावे. मृतदेह हाताळताना वापरलेले कापड, हॅण्ड ग्लोव्ह्ज, सर्जिकल मास्क, दोरी तसेच इतर गोंष्टीची योग्य ती विल्हेवाट करावी. तसेच परिसराचे सोडियम हायपोक्लोराईडद्वारे निर्जंतुकीकरण करण्यात यावे.- राख गोळा करणे सुरक्षितडॉ. श्रीगिरीवार म्हणाले, दहन प्रक्रियेनंतर अस्थी विसर्जनासाठी राख गोळा करण्यास हरकत नाही. राख ही विषाणूमुक्त असते. परंतु राख हाताळल्यानंतर हाताची स्वच्छता राखण्याकरिता साबणाचा किंवा ७० टक्के अल्कोहोलमिश्रित सॅनिटायझरचा वापर करावा. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू