शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात साडेआठ हजारांवर झाडांनी घेतला मोकळा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 21:59 IST

शहरात सिमेंट रस्त्यांची कामे करताना कंत्राटदारांच्या बेजबाबदारपणामुळे दहा हजारांहून अधिक झाडांच्या बुध्याजवळ कांक्रिटीकरण वा गट्टू लावण्यात आले होते. यामुळे झाडांना धोका निर्माण झाला होता. महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांनी बुंधे मोकळे करण्याचे आदेश दिले. त्यानुसार ८६९७ झाडांचे बुंधे मोकळे केले आहेत. शिल्लक असलेल्या हजाराहून अधिक झाडांचे बुंधे आठवडाभरात मोगळे केले जाणार आहेत.

ठळक मुद्देआठवडाभरात सर्व झाडांचे बुंधे मोकळे करणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात सिमेंट रस्त्यांची कामे करताना कंत्राटदारांच्या बेजबाबदारपणामुळे दहा हजारांहून अधिक झाडांच्या बुध्याजवळ कांक्रिटीकरण वा गट्टू लावण्यात आले होते. यामुळे झाडांना धोका निर्माण झाला होता. महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांनी बुंधे मोकळे करण्याचे आदेश दिले. त्यानुसार ८६९७ झाडांचे बुंधे मोकळे केले आहेत. शिल्लक असलेल्या हजाराहून अधिक झाडांचे बुंधे आठवडाभरात मोगळे केले जाणार आहेत.सिमेंट रस्त्यांच्या विळख्यातून बुंधे मोकळे व्हावे यासाठी आयुक्तांनी वेळोवेळी आढावा घेतला. २८ मे रोजी झालेल्या आढावा बैठकीत आयुक्तांनी दोन आठवड्यात शिल्लक ३७१८ झाडांची बुंधे मोकळे करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार एका आठवड्यात १९४३ झाडांचे बुंधे मोकळे करण्यात आले. १७७५ झाडे बुंधे मुक्त करण्याचे शिल्लक आहे. यापैकी सुमारे ७५० झाडे ही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील आहेत. वर्धा मार्ग, अमरावती मार्ग व छिंदवाडा मार्गावरील ही झाडे आहेत. या झाडांचे बुंधे मोकळे करण्यासंदर्भात संबंधित विभागाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र अद्याप प्रतिसाद मिळाला नाही. मनपाच्या अखत्यारितील शिल्लक झाडे आठवडाभरात सिमेंट रस्त्यांच्या विळख्यातून मुक्त करण्यात येतील, अशी माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.सिमेंट रस्त्यांच्या बांधकामात शहरातील अनेक झाडांचे अस्तित्व धोक्यात आल्याची बाब लक्षात येताच अभिजित बांगर यांनी उद्यान विभागाला झाडांच्या सर्वेक्षणाचे आदेश दिले. यात शहरातील २५२३७ झाडांपैकी १४७६५ झाडे सुरक्षित आढळली. मात्र १०४७२ झाडांच्या अस्तित्वाला धोका असल्याचे दिसून आले. या झाडांचे बुंधे लवकरात लवकर मोकळे करण्याचे आदेश दिले. आयुक्तांच्या मार्गदर्शनात सुरू असलेली ही मोहीम अंतिम टप्प्यात असून शहरातील सर्व झाडे लवकच मोकळा श्वास घेणार आहेत.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाenvironmentवातावरण