शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पर्याय शोधण्याचा प्रयत्न म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी : सुधीर मुनगंटीवार यांचा शिवसेनेवर नेम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 19:58 IST

शिवसेनेसाठी जसे पर्याय आहेत तसे भाजपसमोरही आहे. पण असे पर्याय शोधण्याचा प्रयत्न करणे म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी होय, अशा शब्दात भाजपचे ज्येष्ठ नेते वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना शिवसेनेवर नेम साधला.

ठळक मुद्देमहायुतीचेच सरकार व्हावे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधानसभेची निवडणूक महायुतीने एकत्र येऊन लढली होती. मतदारांचा जनादेश नवीन पर्याय शोधण्यासाठी नाही. शिवसेनेसाठी जसे पर्याय आहेत तसे भाजपसमोरही आहे. पण असे पर्याय शोधण्याचा प्रयत्न करणे म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी होय, अशा शब्दात भाजपचे ज्येष्ठ नेते वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना शिवसेनेवर नेम साधला.मुनगंटीवार यांनी मंगळवारी सायंकाळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी भेट देऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पत्रकारांशी बोलताना मुनगंटीवार यांनी युतीमधील रस्सीखेच संपेल, असा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, जनतेचा जनादेश हा महायुतीला आहे. ‘फिप्टी-फिप्टी’ फॉर्म्युल्याबाबत अमित शहा आणि उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री बसतील. अमित शहा कधीही मुंबईला येतील. आमचे सगळे निश्चित आहे.आमची हृदयापासून इच्छा महायुतीचेच सरकार यावे, असेही त्यांनी सांगितले.राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी शिवसेनेने मागितला तर पाठिंबा देऊ असे संकेत दिले आहे, याकडे लक्ष वेधले असता मुनगंटीवार म्हणाले, ते असे संकेत देतीलच. प्रश्न शिवसेनेचा आहे. महायुतीत निवडणूक लढवली. शिवसेनेला अशाच पद्धतीने पर्याय निवडायचा होता तर युती न करता निवडणूक लढवता आली असती, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारShiv Senaशिवसेना