शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा प्रभाव :  वैद्यकीय पीजी अभ्यासक्रमाच्या परीक्षा १५ जूनपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 00:10 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वैद्यकीय पदव्युत्तर पदवी (पीजी) अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता या परीक्षा १५ ते २२ जून २०२० या कालावधीत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा निर्णय

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वैद्यकीय पदव्युत्तर पदवी (पीजी) अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता या परीक्षा १५ ते २२ जून २०२० या कालावधीत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी सांगितले की, आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयातील वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या उन्हाळी सत्रासाठी एम.डी., एम.एस., डिप्लोमा, एम.एससी अभ्यासक्रम आदी अभ्यासक्रमांची परीक्षा १२ मे २०२० पासून सुरू होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. परंतु निवासी डॉक्टर संघटनेचे (मार्ड)अध्यक्ष डॉ. राहुल वाघ व इतर पदाधिकाऱ्यांनी विद्यापीठाचे प्रति-कुलपती, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांना व विद्यापीठाला यासंदर्भात निवेदन दिले होते. याबाबत डी.एन.बी. व इतर पुढील अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन वैद्यकीय शिक्षणमंत्री देशमुख यांच्या सूचनेनुसार वैद्यकीय ‘पीजी’ अभ्यासक्रमांच्या परीक्षा वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.असे आहे सुधारित वेळापत्रकसुधारित वेळापत्रकानुसार पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाचा ‘पेपर-१’ १५ जून २०२० रोजी, ‘पेपर-२’ १७ जून, ‘पेपर-३’ १९ जून आणि ‘पेपर-४’ २२ जून रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत निश्चित करून देण्यात आलेल्या परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहेत. तसेच ‘सत्र-२’ च्या उन्हाळी परीक्षेसाठी परीक्षा अर्ज विद्यापीठात विना विलंब शुल्कासहीत सादर करण्यासाठी ५ मे २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विलंब शुल्कासह परीक्षा अर्ज सादर करण्यासाठी ८ मे २०२० आणि अति विलंब शुल्कासहीत १२ मे २०२० पर्यंत विद्यापीठाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे.कोरोना रुग्णसेवेत पीजी विद्यार्थीकोरोना (कोविड-१९) विषाणूच्या संसर्गास अटकाव करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. रुग्णसेवेसाठी पदव्युत्तर अभ्यासक्रमातील (पीजी) विद्यार्थ्यांची मदत होत आहे. या पार्श्वभूमीवर ‘मे-२०२०’ उन्हाळी सत्रातील वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा १५ जूनपासून घेण्यात येणार आहेत.-डॉ. दिलीप म्हैसेकर, कुलगुरू, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ

टॅग्स :Healthआरोग्यuniversityविद्यापीठexamपरीक्षा