शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण एका शाळेत, टीसी दुसऱ्या शाळेचा, युडायस नंबर तिसऱ्याच शाळेचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:25 IST

मंगेश व्यवहारे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आधुनिक शिक्षणाचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपये वसूल करणाऱ्या एका शाळेचा बनावटपणा उघडकीस ...

मंगेश व्यवहारे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : आधुनिक शिक्षणाचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपये वसूल करणाऱ्या एका शाळेचा बनावटपणा उघडकीस आला आहे. या शाळेत शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या पालकाने शाळा सोडण्याचा दाखला (टीसी) मागितला असता त्याला दुसऱ्याच शाळेचा टीसी दिला. त्यावर दाखल असलेला यु-डायस नंबर हा तिसऱ्याच शाळेचा आहे. त्यामुळे एक विद्यार्थी तीन शाळेत कसा, अशी स्थिती निर्माण झाली आहे. या शाळेत ९०० विद्यार्थी असल्याची माहिती आहे. म्हणजेच या शाळेने हा बोगसपणा करून या विद्यार्थ्यांच्या पालकांची फसवणूक केल्याचे दिसून येत आहे.

ही नामांकित शाळा वाठोडा येथील नारायणा ई-टेक्नो स्कूल आहे. २०१९-२० या सत्रात शाळा सुरू झाली. नर्सरी ते सातवीपर्यंत ९०० विद्यार्थी येथे प्रवेशित असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे शाळेने आधुनिक आणि स्मार्ट शिक्षणाचे आमिष दाखवून विद्यार्थ्यांचे प्रवेश करवून घेतले होते. याच शाळेत तिसऱ्या वर्गात निर्मित प्रशांत चकोले हा विद्यार्थी शिकत होता. शाळेतील अध्यापनाची पद्धती व मुलाची शैक्षणिक प्रगती समाधानकारक नसल्याने पालक प्रशांत चकोले यांनी जून महिन्यात महिन्यात शाळा सोडण्याचा दाखला मिळविण्यासाठी अर्ज केला. वेगवेगळे कारणे देऊन त्यांना सुरुवातीला टाळण्यात आले. पण प्रशांत चकोले यांनी खंबीर भूमिका घेतल्याने सहा महिन्यानंतर त्यांना शाळा सोडण्याचा दाखला देण्यात आला.

नारायणा ई-टेक्नो या शाळेने पालकाला दिलेला शाळा सोडण्याचा दाखला हा किड्स प्ले स्कूल इंग्लिश प्रायमरी दाभा, नागपूर या शाळेचा दिला. पण या दाखल्यावर शाळेचा जो युडायस नंबर दिलेला आहे. तो झोया एज्युकेशन अ‍ॅण्ड वेलफेअर चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेच्या यशवंत इंग्लिश स्कूल दाभा या शाळेचा असल्याचे राज्य शासनाच्या युडायस पोर्टलवरून निदर्शनास येते. शाळेने केलेल्या या बोगसपणामुळे विद्यार्थ्यांचा प्रवेश अडचणीत आलेला आहे. ज्या शाळेचा टीसी दिला तिथे विद्यार्थ्याची नोंद नाही, जो युडायस नंबर दिला, त्यावरही विद्यार्थ्याची नोंद नाही.

शिक्षण तज्ञांच्या मते ज्या शाळेला युडायस नंबर नाही, त्या शाळेला शासनाची मान्यता नाही. त्यामुळे शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची सरल पोर्टलवर नोंद होऊ शकत नाही. म्हणजेच येथे शिक्षण घेणारे सर्व विद्यार्थी हे अवैध आहे.

- वाठोडा येथील नारायणा ई-टेक्नो या शाळेत माझा मुलगा तिसऱ्या वर्गात शिकला. मला शाळेची अध्यापन पद्धती व शैक्षणिक प्रगती समाधानकारक वाटली नाही. त्यामुळे शाळा सोडण्याचा दाखला मागितला. पण दाखला दुसऱ्याच शाळेचा दिला. मी ६५ हजार रुपये शाळेचे शैक्षणिक शुल्क भरले. माझ्याशी शाळेने केलेल्या फसवणुकीसंदर्भात वाठोडा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलो, पण पोलिसांनी तक्रार घेतली नाही. शिक्षण विभागाकडून आम्हाला फोन आल्यावर कारवाई करू, असे त्यांनी सांगितले.

प्रशांत चकोले, पालक

-बोगसपणा आहेच, चौकशी करू

शाळेने हा बोगसपणा केलेला आहे. पण तरीही आम्ही योग्य ती शहनिशा करून चौकशी करू.

चिंतामण वंजारी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि. प.

- फेब्रुवारी महिन्यात युडायस नंबर मिळेल

यासंदर्भात शाळेच्या प्राचार्य डॉ. सुलक्षणा भुयार यांच्याशी संपर्क केला असता, त्या म्हणाल्या आम्ही ज्या शाळेचा टीसी दिलेला आहे. त्या शाळेसोबत आमचा टायअप झालेला आहे. ज्या शाळेचा युडायस नंबर दिलेला आहे. त्या शाळेत विद्यार्थ्यांचे सरल पोर्टलमध्ये नाव नोंदविलेले आहे. आम्हाला फेब्रुवारी महिन्यात युडायस नंबर मिळणार आहे. माझा संबंध फक्त अ‍ॅकेडेमिकशी आहे.