शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

नागपूर विभागातील शिक्षण विभाग लाचखोरीत पाचवा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 11:16 IST

पोलीस, महसूल, जिल्हा परिषदेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसारखीच लाचेची मागणी करून नागपूर विभागाच्या शिक्षण विभागातील मंडळींनी लाचखोरीत पाचवे स्थान गाठले आहे.

ठळक मुद्देफॉरेस्ट, एनएमसीला मागे टाकले विभागात एकूण ८३ ट्रॅप, ११४ गजाआड

नरेश डोंगरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पवित्र मानला जाणाऱ्या शिक्षण विभागाला लाचखोरीची उधळी लागली आहे. वरकमाईसाठी चटावलेल्या आणि लाचखोरीसाठी कुपरिचित असलेल्या पोलीस, महसूल, जिल्हा परिषदसारख्या विभागांमध्ये शिक्षण विभागाचाही समावेश झाला आहे. पोलीस, महसूल, जिल्हा परिषदेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसारखीच लाचेची मागणी करून नागपूर विभागाच्या शिक्षण विभागातील मंडळींनी लाचखोरीत पाचवे स्थान गाठले आहे. विशेष म्हणजे, गेल्या दहा महिन्यात शिक्षण विभागाने फॉरेस्ट, एनएमसी, वीज मंडळालाही मागे टाकले आहे.राज्यात दरवर्षी २८ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत दक्षता व जनजागृती सप्ताह साजरा केला जातो. या आठवड्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) तर्फे विविध उपक्रम, कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. भ्रष्टाचार करणार नाही आणि भ्रष्टाचार होऊ देणार नाही, अशी शपथ प्रत्येक विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिली जाते. मात्र, भ्रष्टाचाराची शपथ खाणारी मंडळी ‘लाच खाण्याघेण्याबाबत’ त्याला फारसे गांभीर्याने घेत नाही, हे दरवर्षी एसीबीकडून केल्या जाणाऱ्या कारवायातून उघड होते. पुन्हा एकदा ते अधोरेखित झाले. १ जानेवारी ते ३१ ऑक्टोबर २०१९ या कालावधीत एसीबीने नागपूर विभागाच्या महसुली क्षेत्रातील सहा जिल्ह्यात तब्बल ८७ सापळे लावले. त्यात ११४ भ्रष्टाचारी अडकले. गरजू व्यक्तींना अडवून त्याचे काम करण्यासाठी कुणी पाच हजार रुपये मागितले तर, कुणी चक्क लाखोंची मागणी केली. नुसतीच मागणी केली नाही तर लाचेची रक्कम स्वीकारताना ते पकडलेही गेले. या भ्रष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कुठे आपले दलाल नेमून ठेवले होते. ते त्यांच्याच हाताने रक्कम स्वीकारत होते. या दलालात कुणी चहा-पान टपरी चालविणारा होता तर, कुणी साहेबाच्या कार्यालयाच्या आजूबाजूला घुटमळणारा आहे.विशेष म्हणजे, सर्वाधिक लाचेचे २९ सापळे नागपूर शहरात तर सर्वाधिक कमी पाच सापळे बापूंच्या वर्धा जिल्ह्यात लागले. गेल्या वर्षी (सन-२०१८) सर्वाधिक २७ सापळे चंद्रपूर जिल्ह्यात तर सर्वाधिक कमी १२ सापळे वर्धा जिल्ह्यात लागले होते.पोलीसच अव्वलस्थानी !एसीबीच्या सापळ्यात अडकेल्या विभागांमध्ये नेहमीप्रमाणे याहीवर्षी पोलीस विभागच अव्वलस्थानी राहिला. पहिल्या पाच लाचखोर विभागांपैकी पोलीस विभागातील १८ जणांवर एसीबीने कारवाई करून त्यांच्या दलालांसह २४ जणांना पकडले. महसूल विभागात १६ सापळे लावून दलालांसह २२ जणांना पकडण्यात आले. जिल्हा परिषदेतील ७ भ्रष्टाचाऱ्यांसह ९ जणांना जेरबंद करण्यात आले. वीज मंडळातील ८ तर शिक्षण विभागात ५ सापळे लावून ६ जणांना पकडण्यात आले. त्यांच्या पाठोपाठ फॉरेस्ट, वित्त विभाग, पंचायत समिती, नगर परिषद आणि आरोग्य विभागाची मंडळी लाच घेताना पकडली गेली. नॅशनल हाय वे च्या अधिकाऱ्यांच्या नावाने सर्वाधिक २२ लाखांची लाच मागून १२ लाखांचा चेक घेणारा एक दलाल पकडला गेला, ही यावर्षीची एसीबीची सर्वात मोठी कारवाई ठरली. कृषी, फूड अ‍ॅन्ड ड्रग, नगर रचना, एनएमसी, समाज कल्याण आणि आरटीओतील कोणताही अधिकारी, कर्मचारी एसीबीच्या हाती लागला नाही, हे विशेष !

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरण