शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील उच्चशिक्षित युवतीची तीन लाखांनी फसवणूक; ईमेलद्वारे दिले आमिष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 13:05 IST

एका टोळीने ई-मेलद्वारे एअर पोस्ट इंडिया कुरिअर कंपनीची शाखा देण्याचे आमिष दाखवून एका उच्चशिक्षित युवतीला तीन लाखांनी फसवले. या प्रकरणी युवतीच्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देउत्तरप्रदेशातील टोळी

आॅनलाईन लोकमतनागपूर : एका टोळीने ई-मेलद्वारे एअर पोस्ट इंडिया कुरिअर कंपनीची शाखा देण्याचे आमिष दाखवून एका उच्चशिक्षित युवतीला तीन लाखांनी फसवले. या प्रकरणी युवतीच्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. या टोळीने महाराष्ट्रासह अन्य राज्यातील अनेकांना गंडा घातला असण्याची शक्यता आहे.लकडगंज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नफिस सफी अब्दुल्ला शेख (२९) रा. लकडगंज भंडारा रोड, नागपूर ही फसवणुक झालेली उच्चशिक्षित युवती आहे. २२ डिसेंबरला तिला एअर पोस्ट इंडिया कुरिअर अ‍ॅन्ड लॉजिस्टीक कंपनीकडून ई-मेल आला. त्यामध्ये नागपुरात कंपनीची शाखा देण्यासंदर्भात माहिती देण्यात आली होती. नफिस सफी यांनी शाखा घेण्यात रस दाखवून कंपनीला परत ई-मेल केला. नफिसला आरोपी अरविंद गांधी (४०) रा. गाजियाबाद, उत्तर प्रदेश याचा फोन आला. त्याने युवतीला तो कंपनीचा अधिकृत अधिकारी असल्याचे सांगितले. शाखेबाबत व्यवहारासंदर्भात फोनवरून चर्चा केली. नफिस हिला डिपॉझिट रक्कम म्हणून तीन लाख रुपयांच्या धनादेशाची मागणी केली. नामांकित कंपनीची शाखा मिळत असल्यामुळे नफिसने धनादेश दिले. त्यानंतर आरोपी रोमी धर्मवीर (२७) रा. नागलोही, दिल्ली हिचा फोन आला. तिने कंपनीची उपशाखा काही दिवसात मिळणार असल्याचे सांगितले. त्यासाठी बँकेत पैसे भरण्यास सांगितले. आरोपी मनिष देवसिंग रा. बदरपूर-दिल्ली याचा फोन आणि ई-मेल आला. त्याने कंपनीच्या एचआर विभागातून बोलत असल्याचे सांगून कंपनीच्या उपशाखेबाबत कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगितले.२६ डिसेंबरपर्यंत या टोळीने धनादेश वटवून पैसे काढून घेतले आणि शाखा न देता फसवणूक केली. नफिस यांनी कंपनीच्या जाहिरातीबाबत माहिती काढली असता, कंपनीने अशी कोणतीही जाहिरात दिली नसल्याचे सांगण्यात आले. फसवणूक करणारी टोळी सराईत असल्याचे लक्षात येताच नफिस सफी हिने लकडगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी तिघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम