नागपूर : सक्तवसुली संचालनालय नागपूरने नाशिक येथे काळा पैसा प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई करून १७ फेब्रुवारीला तीन जणांना अटक केली. संपत नामदेव घोरपडे, अरुण नामदेव घोरपडे आणि विश्वास नामदेव घोरपडे अशी आरोपींची नावे आहेत.
हे तिघेही संघटित गुन्हेगारी करून अवैधपणे सार्वजनिक वितरण यंत्रणेचा लाभ घेत होते. या तिघेही नाशिक येथे शासकीय रेशन धान्याच्या कोट्याची ब्लॅक मार्केटिंग करत होते. आरोपी वैयक्तितरीत्या, संयुक्तपणे टोळी करून धान्य काळ्या बाजारात विकत होते. या तिघांनी अवैध व्यवहारातून १७७ कोटी रुपये गोळा केले आहेत. नाशिक पोलिसांनी मोक्का अंतर्गत नोंदविलेल्या एफआयआरच्या आणि चार्जशिटच्या आधारावर सक्तवसुली संचालनालय नागपूरच्या अधिकाऱ्यांनी या तिघांची सखोल चौकशी केली. चौकशीत आढळलेल्या तथ्याच्या आधारे तिघांना अटक केली.