शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

नागपुरातील डब्बा प्रकरणाचे झाकण फोडणार ईडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 11:05 AM

देशभरात खळबळ निर्माण करणाऱ्या डब्बा प्रकरणाची बंद पडलेली चौकशी प्रवर्तन संचालनालयाने (ईडी) सुरू केली आहे.

ठळक मुद्देचौकशी सुरू, धक्कादायक घडामोडींचे संकेत संबंधित वर्तुळात खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशभरात खळबळ निर्माण करणाऱ्या डब्बा प्रकरणाची बंद पडलेली चौकशी प्रवर्तन संचालनालयाने (ईडी) सुरू केली आहे. नागपूरसोबतच मुंबई, अहमदाबाद, जयपूर तसेच दिल्लीशी जुळलेल्या ईडीच्या तारा शोधण्यासाठी ईडी सक्रिय झाल्याने धक्कादायक घडामोडींचे संकेत मिळाले आहे. त्यामुळे संबंधित वर्तुळात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.लोकमतने डब्बा प्रकरणाचा सर्वप्रथम खुलासा केला होता. डब्बा व्यापारी कुशल लद्दड आणि वीणा सारडा यांच्यातील आर्थिक व्यवहारात कटुता आल्याने डब्ब्याचे झाकण फुटले होते.बोभाटा झाल्यामुळे गुन्हे शाखेने १२ मे २०१६ ला डब्बा चालविणाऱ्यांच्या घरी आणि कार्यालयात छापेमारी केली होती. त्यात आढळलेल्या कागदपत्रांच्या आधारे २४ जणांना आरोपी बनवून कुशल लद्दड, प्रितेश लखोटिया, गोविंद सारडा, विजय गोखलानी, अभिषेक बजाज, नीरज अग्रवाल, अश्विन बोरीकर, विकास कुबडेंसह १० जणांना अटक केली होती. तर, रवी अग्रवाल, वीणा सारडा, कन्नी थावरानी, सचिन अग्रवालसह १४ आरोपींनी स्वत:ची अटक टाळण्यात यश मिळवले होते. या घडामोडीमुळे डब्बा व्यापाराचे नागपूर प्रमुख केंद्र असल्याचे पोलीस तपासात त्यावेळी उघड झाले होते. डब्बा व्यवहारातून नागपूरसह ठिकठिकणाच्या शहरात रोज लाखो कोटींचा व्यवहार होत असल्याचे तसेच या गोरखधंद्यात गुंतलेली मंडळी इंदोरच्या सौदा सॉफ्टवेअरचा वापर करत असल्याची चर्चा होती. पोलिसांनी केलेल्या छापेमारीत संगणक, हार्ड डिस्कमधून धक्कादायक बाबी पोलिसांच्या हाती लागल्या होत्या. प्रारंभी या प्रकरणाची पोलिसांनी कसून चौकशी केली. नंतर मात्र पोलीस या प्रकरणाच्या तपासात हतबल झाल्यासारखे वागू लागले. दरम्यान, अनेक महत्त्वपूर्ण पुरावे गायब झाल्याची ओरड झाली अन् या पार्श्वभूमीवर, पोलिसांना गुंगारा देणाऱ्या डब्बा प्रकरणाच्या सूत्रधारांसह अनेकांना जामीन मिळाला. सरकारचा कोट्यवधींचा कर चुकविणाऱ्या आणि रोज लाखो-करोडोंचा गोरखधंदा करवून देशाची अर्थव्यवस्था कमकुवत करणाऱ्या या खळबळजनक प्रकरणात पोलिसांनी घेतलेली भूमिका धक्कादायक होती. त्यामुळे चौकशी दुसऱ्या तपास यंत्रणांना सोपविली जाणार, असा अंदाज होता. तो आता खरा ठरला. गेल्या महिन्यात ईडीने बंद पडलेल्या डब्बा प्रकरणाच्या तपासाचे झाकण पुन्हा उघडले.बचावासाठी ‘छत्राची’ शोधाशोधसूत्रांच्या माहितीनुसार, डब्याचे कनेक्शन नागपुरातील एका सीएसह छत्तीसगडमधील काही दिग्गजांसोबत असल्याची चर्चा होती. म्हणूनच पोलिसांवर वेगवेगळ्या पद्धतीने प्रभाव टाकून हा तपास थंडबस्त्यात टाकण्यात आल्याची चर्चा होती. ईडीने तपास हाती घेतल्याने संबंधित वर्तुळाचे धाबे दणाणले आहे. डबा प्रकरणातील आरोपींच्या आर्थिक व्यवहाराची माहिती एकत्रित केली जात असल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर, संबंधित वर्तुळातील मंडळांनी स्वत:च्या बचावासाठी ‘छत्र’ शोधणे सुरू केले आहे.

टॅग्स :Governmentसरकार