शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सक्षम पत्रकारितेतूनच देशाला आर्थिक आणि सामाजिक न्याय : सिद्धार्थ वरदराजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 00:41 IST

पत्रकारिता ही मूल्यांवर आधारलेली असते. त्यामुळे सक्षम पत्रकारिताच या देशातील लोकशाही बळकट करू शकते तसेच या देशातील आर्थिक आणि सामाजिक न्यायही यातूनच मिळविला जाऊ शकतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक सिद्धार्थ वरदराज यांनी केले.

ठळक मुद्दे‘मूकनायक’ शताब्दी समारोह

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पत्रकारिता ही मूल्यांवर आधारलेली असते. त्यामुळे सक्षम पत्रकारिताच या देशातील लोकशाही बळकट करू शकते तसेच या देशातील आर्थिक आणि सामाजिक न्यायही यातूनच मिळविला जाऊ शकतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक सिद्धार्थ वरदराज यांनी केले.दीक्षाभूमी येथील ऑडिटोरियम सभागृहात मंगळवारी सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘मूकनायक’ पत्रकारितेचा शताब्दी समारंभ झाला. अध्यक्षस्थानी प्रा. रणजित मेश्राम होते. ज्येष्ठ संपादक सुभाष शिर्के आणि कार्यक्रमाचे आयोजक आवाज इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अमन कांबळे मुख्य पाहुणे होते.प्रश्न विचारण्याची हिंमत विसरलात तर पत्रकारितेला काहीच अर्थ नाही, असे डॉ. आंबेडकर म्हणायचे, याची आठवण करून सिद्धार्थ वरदराज म्हणाले, मीडियावर सामाजिक जबाबदारी मोठी असते. मात्र आज मीडिया धोक्याच्या वळणावर उभा असल्याचा इशारा त्यांनी दिला. मीडियात सामाजिक प्रश्नांना हवे तेवढे स्थान मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.डॉ. बाबासाहेबांनी मूकनायकची सुरुवातच बहुजनांचा अर्थात भारताचा आवाज बुलंद करण्यासाठी केली होती. मात्र १०० वर्षांनंतरही असे होत नसेल तर लोकशाही धोक्यात आहे, असे समजावे लागेल. व्यक्त होण्यासाठी सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम आहे. मात्र त्यात खरेपणा जपा, असे अवाहन पत्रकारितेतील नवोदितांना केले. दिसते ती सत्य परिस्थिती मांडा. सतत व्यक्त होत राहा, तिरंग्याचा आदर्श पायदळी तुडविणाऱ्यांचे प्रयत्न हाणून पाडा, असा सल्ला त्यांनी दिला.सुभाष शिर्के म्हणाले, पत्रकारितेतील बाबासाहेबांची दृष्टी वेगळी होती. त्यांचे पत्रकारितेतील मोठेपण देशातील तत्कालीन नेत्यांना उशिरा कळले. मीडियाची शक्ती त्यांनी ओळखली होती, मात्र बहुजन समाजाने मीडियाकडे लक्ष दिले नाही. देशातील मीडियात कोणत्या समाजाचे किती आहेत याचा सर्वे व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.प्रा. रणजित मेश्राम म्हणाले, बाबासाहेबांची पत्रकारिता म्हणजे समाजाचा आरसा होती. त्यांचा संतसाहित्यावर प्रचंड अभ्यास होता. त्यांनी विषमतेवर सतत प्रहार केले. मूकनायक आणि नंतरच्या पत्रकारितेतून त्यांनी पेरलेले बीज लोकशाही सशक्त करणारे आहे, असे ते म्हणाले. कार्यक्रमाच्या मुख्य पाहुण्या अरफा खानन शेरवानी येऊ शकल्या नाहीत. यांचा संदेश यावेळी चित्रफितीच्या माध्यमातून दाखवण्यात आला. प्रास्ताविक अमन कांबळे यांनी केले. संचालन राजेंद्र फुले यांनी केले. नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरJournalistपत्रकार