शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

आचारसंहितेचा आपली बसला आर्थिक फटका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 23:17 IST

लोकसभा निवडणूक आचारसंहिता कालावधीत आपली बसच्या तिकिटापासून मिळणाऱ्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. हे ऐकून आश्चर्य वाटेल. परंतु हे वास्तव आहे, या कालावधीत तिकीट तपासणी करणाऱ्यांवर कुणाचाही अंकुश नव्हता. अधिकारी निवडणुकीच्या कामात व्यस्त होते तर परिवहन समितीच्या पदाधिकाऱ्यांना हस्तक्षेप करता येत नव्हता. वास्तविक तीन डिझेल ऑपरेटरवर नियंत्रण ठेवण्यासाठी आयबीटीएम ऑपरेटर दिल्ली इंटिग्रेटेड मल्टी मॉडल ट्रांजिट सिस्टीम्स लिमिटेड(डिम्ट्स)चे दुर्लक्ष झाल्यामुळे हा प्रकार घडला आहे.

ठळक मुद्देपरिवहन विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचे डिम्ट्सला पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणूक आचारसंहिता कालावधीत आपली बसच्या तिकिटापासून मिळणाऱ्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. हे ऐकून आश्चर्य वाटेल. परंतु हे वास्तव आहे, या कालावधीत तिकीट तपासणी करणाऱ्यांवर कुणाचाही अंकुश नव्हता. अधिकारी निवडणुकीच्या कामात व्यस्त होते तर परिवहन समितीच्या पदाधिकाऱ्यांना हस्तक्षेप करता येत नव्हता. वास्तविक तीन डिझेल ऑपरेटरवर नियंत्रण ठेवण्यासाठी आयबीटीएम ऑपरेटर दिल्ली इंटिग्रेटेड मल्टी मॉडल ट्रांजिट सिस्टीम्स लिमिटेड(डिम्ट्स)चे दुर्लक्ष झाल्यामुळे हा प्रकार घडला आहे.एप्रिल महिन्यात तिकिटापासून दररोज ११ ते १९ लाखांचे उत्पन्न झाले. मात्र अनेक दिवस असे होते की त्या दिवसाला उत्पन्न कमी व्हायला नको होते.२२ जानेवारी २०१९ रोजी आपली बसच्या भाड्यात २५ टक्के वाढ करण्यात आली होती. त्यामुळे महापालिकेला दररोज १२ ते १६ लाखांचा महसूल मिळत होता. तिकीट दर वाढविल्यामुळे उत्पन्नात वाढ होणे अपेक्षित होते. परंतु त्यानंतरही उत्पन्न वाढले नाही. आचारसंहिता कालावधीतील उत्पन्नाची आकडेवारी बघितली तर यात सतत चढउतार असल्याचे निदर्शनास येते.मतदानादरम्यान १० व ११ एप्रिलला बसेस निवडणुकीच्या कामात होत्या. या दिवशी बसचे उत्पन्न कमी होणे अपेक्षितच होते. परंतु त्यानंतरच्या दिवसात कमी उत्पन्न झाले आहे. याची दखल घेत परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी डिम्ट्सला पत्र पाठवून स्पष्टीकरण मागितले. मात्र डिम्ट्सने २२ एप्रिलला पत्राला उत्तर पाठवून उत्पन्नावर परिणाम झाला नसल्याचे सांगितले.विशेष म्हणजे काही मार्गावरील बसेसमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. त्यानंतरही प्रवाशांची संख्या १.४५ लाखापर्यंतच पोहचली आहे. डिम्ट्सच्या तिकीट निरीक्षकांच्या भूमिकेवर परिवहन समितीने अनेकदा आक्षेप नोंदविला. समितीतर्फे गठित भरारी पथकांनी धाडी घातल्यानंतर दररोजच्या उत्पन्नात २ ते ३ लाखांनी वाढ झाली होती. मात्र कारवाई थांबताच उत्पन्नातही घट झाली.दोन वर्षानंतरही मार्गांच्या उत्पन्नाचे निर्धारण नाहीदिल्लीसह देशभरातील मोठ्या शहरात मार्गांच्या आधारावर बसच्या उत्पन्नाचे निर्धारण केले जाते. यासाठी आठवड्यातील सात दिवस एक पथक बसमधून प्रवास करून तिकीट विक्रीतून होणाऱ्या उत्पन्नाची वास्तव माहिती गोळा करतात. त्याआधारे मार्गावर होणाऱ्या उत्पन्नाचे निर्धारण केले जाते. दोन वर्षापूर्वी महापालिकेच्या परिवहन विभागाने आपली बससेवा सुरू केली. डिम्ट्सकडे बस नियंत्रणाची जबाबदारी सोपविण्यात आली. परंतु डिम्ट्सने अद्याप मार्गाच्या आधारावर उत्पन्नाचे निर्धारण केलेले नाही. यामुळे तिकिटापासून होणाऱ्या उत्पन्नावर परिणाम होत आहे.डिम्ट्सचे स्पष्टीकरणातील मुद्दे

  • शहर बसच्या तिकीटदरात सहा महिन्यापूर्वी नव्हे तर तीन महिन्यापूर्वी वाढ करण्यात आली. उत्पन्नात घट झालेली नाही.
  • १ ते १६ एप्रिल दरम्यान गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ६६ बसेस(१८ टक्के) बसेस कमी धावल्या. किलोमीटरमधील अंतरही कमी आहे.
  • १० व ११ एप्रिलला २४२ बसेस निवडणुकीच्या कामात होत्या. या दिवसाला बसेस मोजक्याच धावल्या.
  • एकूण उत्पन्नात ३ टक्के वाढ झालेली आहे. उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत.
टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाBus Driverबसचालक