शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

ईटनकर, साखळे यांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 23:48 IST

शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. नागपूर विद्यापीठाच्या औषधी निर्माणशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.प्रकाश ईटनकर व प्रियदर्शिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.चंद्रशेखर साखळे यांची या पुरस्कारांसाठी निवड झाली आहे. ५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता दीक्षांत सभागृहात शिक्षक दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी दिली.

ठळक मुद्देनागपूर विद्यापीठ : उत्कृष्ट संशोधक व लेखकांचादेखील होणार सन्मान

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. नागपूर विद्यापीठाच्या औषधी निर्माणशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.प्रकाश ईटनकर व प्रियदर्शिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.चंद्रशेखर साखळे यांची या पुरस्कारांसाठी निवड झाली आहे. ५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता दीक्षांत सभागृहात शिक्षक दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी दिली.नागपूर विद्यापीठात दरवर्षी उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येतात. यंदा यात उत्कृष्ट शिक्षक, उत्कृष्ट संशोधक व उत्कृष्ट लेखक या पुरस्कारांचा समावेश आहे. कमला नेहरू महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.वासुदेव गुरनुले यांना उत्कृष्ट संशोधक तर सी.पी.अ‍ॅन्ड बेरार महाविद्यालयाचे सहायक प्राध्यापक डॉ.राजेंद्र नाईकवाडे यांना उत्कृष्ट लेखक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.आशिष पातुरकर हे उपस्थित राहतील. शिक्षण कल्याण निधी अंतर्गत हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.यंदा घटली पुरस्कार विजेत्यांची संख्यादरवर्षी तीन किंवा अधिक प्राध्यापकांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येतो. मात्र यंदा विद्यापीठाने केवळ दोनच शिक्षकांना हा पुरस्कार घोषित केला आहे. दर्जेदार कार्य करणाऱ्यांनाच पुरस्कार प्रदान करण्याची भूमिका विद्यापीठाने घेतली असल्याचे कुलगुरूंनी स्पष्ट केले.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठTeacherशिक्षक