शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मिठाई खा, पण जरा जपून

By admin | Updated: October 30, 2016 02:51 IST

दिवाळीत निरनिराळ्या प्रकारची मिठाई खरेदी करताना नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी

काळजीपूर्वक खरेदी करा : अन्न व औषध प्रशासनाचे आवाहननागपूर : दिवाळीत निरनिराळ्या प्रकारची मिठाई खरेदी करताना नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. तसेच मिठाई निर्मिती करणारे आणि विक्री करणाऱ्यांनी मिठाईची शुद्धता आणि चवीबाबत जागृत राहावे. मुदत संपल्यानंतर मिठाईची विक्री करू नये. कारण ऐन सणाच्या काळात मुदतबाह्य मिठाई खाण्यात आली तर विषबाधा होऊ शकते. नागरिकांनी मिठाई खरेदी करताना मुदतीकडे लक्ष द्यावे, असे आवाहन अन्न आणि औषध प्रशासन विभागाने केले आहे. मुदतीनंतरच्या मिठाईने होऊ शकते विषबाधादिवाळीत निरनिराळ्या प्रकारची मिठाई खरेदी केली जाते. या काळात आप्तस्वकीयांना भेटकार्ड देताना सणाचा गोडवा अधिक वाढावा यासाठी मिठाई देण्याची प्रथा आहे. या काळात दुग्धजन्य मिठाईची सर्वाधिक खरेदी केली जाते. मुदतीनंतर मिठाई खाण्यात आली तर विषबाधा होऊ शकते. त्यामुळे मिठाई खरेदी करताना नागरिकांनी मुदतीचा आणि संभाव्य विषबाधेचा विचार करावा. मिठाई विकताना उत्पादक कंपनी आणि विक्रेत्यांनीही डब्यावर मुदतीचा उल्लेख करावा. मुदतबाह्य मिठाई विकू नये. कारण दिवाळीचा आनंद साजरा होत असताना मिठाई खाण्यातून विषबाधा होऊ नये. अन्न आणि औषध प्रशासन ठिकठिकाणी तपासणी करीत आहे. पण नागरिकांनी मिठाई खरेदी करताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. शहरात विषबाधेच्या घटनादिवाळीत मिठाईमुळे विषबाधा झाल्याच्या घटना घडल्या आहेत. दिवाळी सणात अनेक हॉटेलमालक मिठाईचे उत्पादन महिन्यापूर्वीच सुरू करतात. दुग्धजन्य पदार्थांपासून तयार केलेली मिठाई जास्त दिवस टिकत नाही, हे सर्वश्रुत आहे. बहुतांश उत्पादक मिठाईच्या पॅकेजवर मुदत तारखेचा उल्लेख करीत नाहीत. यासंदर्भात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, दिवाळीत शहरातील सर्व रेस्टॉरंटमध्ये मिठाईची तपासणी करणे शक्य नाही, पण जास्तीतजास्त रेस्टॉरंटची तपासणी करण्यात येते. याशिवाय बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या खोव्याचा दर्जा तपासण्यात येत आहे. निकृष्ट असलेला खोवा जप्त करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी एका रेस्टॉरंटमधून निकृष्ट मिठाई जप्त केली आहे. दिवाळीत विभाग सज्ज असल्याचे अधिकारी म्हणाला.