शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

पृथ्वीलाही ‘लॉकडाऊन’ची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 10:53 IST

पृथ्वीचे तापमान वाढत आहे, याचा अर्थ पृथ्वी आजारी आहे आणि हा आजार दूर करण्यासाठी 'लॉकडाऊन'सारख्या उपचाराची नक्कीच गरज आहे. जलवायू परिवर्तनाचा अभ्यास करणारे वैज्ञानिक याबाबत गंभीर इशारा देत आहेत.

ठळक मुद्देजलवायू परिवर्तनाचे दिसतील गंभीर परिणाम वैज्ञानिकांचा इशारा

निशांत वानखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तापमान आणि हवामान बदल याच घटकांवरून जलवायू परिवर्तनाचे आकलन करता येणार नाही. मात्र कोरोनासारखा कोणताही आजार आला की माणसाच्या शरीराचे तापमान वाढते त्याचप्रमाणे पृथ्वीचे तापमान वाढत आहे, याचा अर्थ पृथ्वी आजारी आहे आणि हा आजार दूर करण्यासाठी 'लॉकडाऊन'सारख्या उपचाराची नक्कीच गरज आहे. जलवायू परिवर्तनाचा अभ्यास करणारे वैज्ञानिक याबाबत गंभीर इशारा देत आहेत.राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थे(नीरी)च्या जलवायू परिवर्तन विभागाचे प्रमुख व प्रधान वैज्ञानिक डॉ. जे. एस. पांडे यांनी गेल्या काही वर्षांतील वातावरणात झालेले बदल अधोरेखित केले आहेत. दरवर्षी पावसाळ्यात थोड्या अधिक फरकाने पण जून, जुलै व आॅगस्ट महिन्यात निर्धारित व नियमित स्वरूपात येतो. गेल्या वर्षी मात्र जून संपल्यावर पाऊस सुरू झाला आणि पुढे हिवाळ्यापर्यंत गेला आणि वर्षभर थोड्या थोड्या दिवसाने हजेरी लावली. तापमान २ ते ३ अंशाने वाढलेच आहे. हा वरवर दिसणारा फरक झाला. मात्र जलवायू परिवर्तनामुळे पृथ्वीवरील अनेक प्राणी आणि पक्षी नामशेष होण्याच्या स्थितीत पोहचले आहेत. एवढेच नाही तर काही वनस्पतीही नष्ट झाल्या आहेत. भविष्यात कदाचित या संकटामुळे काही वनस्पती बहरणार नाही. यामुळे जैवविविधतेवर अदृश्य असे परिणाम होत आहेत.कार्बन सायकल व हायड्रोलॉजिकल सायकल (पाणी) हे दोन महत्त्वाचे घटक आहेत. टाळेबंदीमुळे जलवायू परिवर्तनात मोठी आणि सकारात्मक घट झाली. यासाठी कोणते मोठे तंत्रज्ञान व खर्च करण्याची गरज पडली नाही. हेच नियोजन पुढे करणे गरजेचे आहे. औद्योगिकीकरण, ‘रेसिडेन्सियल अ‍ॅक्टिव्हिटी’ करताना पर्यावरणाला हानी होणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल.‘ग्रीन कव्हर’ वाढविणे व ‘कार्बन फूटप्रिंट’ कमी करणे काळाची गरज आहे. सर्वात मोठे म्हणजे शिक्षण आणि जनजागृती करणे अत्यावश्यक असल्याची भावना डॉ. पांडे यांनी व्यक्त केली.

सामूहिक शेतीची गरजआज देशात ८० टक्के शेतकरी अल्पभूधारक आहेत आणि प्रत्येक शेतकरी आपल्या पिकांसाठी नियोजन न करता पाण्याचा अमर्याद वापर करतो. यामुळे भूजल पातळी घसरून ‘हायड्रोलॉजिकल फूटप्रिंट’वर परिणाम झाला. यासाठी एकतर सामूहिक शेती किंवा कुणाला किती पाणी द्यायचे याचे नियोजन व नियंत्रण ठेवणारी स्वतंत्र स्वायत्त संस्था निर्माण करण्याची गरज डॉ. पांडे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Earthपृथ्वी