शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

जनरेटरमध्ये केस अडकल्याने त्वचेसह कानही बाहेर; अडीच महिने उपचार, डॉक्टरांमुळे जीवनदान

By सुमेध वाघमार | Updated: March 30, 2024 22:09 IST

मेडिकलच्या डॉक्टरांचे अडीच महिने यशस्वी उपचार : १० वर्षीय मुलीचा वाचला जीव

नागपूर : घराजवळ खेळताना एका १० वर्षीय मुलीचे केस जनेरटरमध्ये अडकून ओडल्या गेले. के सासकट त्वचा निघाली. डावा कानही निघाला. कवटी दिसू लागलेल्या अवस्थेत तिला मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल केले. तब्बल अडीच महिने डॉक्टरांनी तिच्यावर यशस्वी उपचार केले. तिला नवे आयुष्य दिले.    

कामठी येथील रहिवासी मानवी ईश्वर इंगोले त्या मुलीचे नाव. १४ नोव्हेंबर रोजी ती घराजवळ खेळत होती. बाजूलाच एक जनरेटर सुरू होते. खेळताना अचानक ती जनरेटर जवळ गेली.. जनरेटरच्या पट्ट्यामध्ये तिचे केस अडकले. ती जनरेटरमध्ये ओढल्या गेली. तिच्या किंचाळ्याने तत्काळ जनरेटर बंद करण्यात आले. परंतु तोपर्यंत डोक्यावरची केसासहित संपूर्ण त्वचा निघाली होती. रक्ताने माखलेल्या अवस्थेत तिला ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल केले. अधिष्ठाता डॉ. राज गजभिये व वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांच्या मार्गदर्शनात प्लास्टिक सर्जरी विभागाचे डॉ. श्रीकांत पेरका, सर्जन डॉ. अब्दुल कुरेशी, डॉ. संगावार, डॉ. अफ्रीन, बधिरीकरण तज्ज्ञ डॉ. अक्षय आणि इतरही डॉक्टरांच्या चमुने शर्थीचे उपचार करून मानवीला नवे जीवन दिले.

तीन टप्प्यात स्किन ग्राफ्टींग ‘लोकमत’शी बोलताना डॉ. पेरका यांनी सांगितले, मुलीचे डोक्याचे हाड उघडे पडले होते. तिच्या डोक्याची त्वचा जोडण्याचा प्रयत्नही केला. परंतु रक्त वाहिन्या आंकुचित झाल्याने ते शक्य झाले नाही. त्यानंतर मुलीला खूप ड्रेसिंग लागले. तिच्या हाडावर मास येण्यासाठी छोटी शस्त्रक्रिया केली. त्यानंतर तिन टप्प्यात स्किन ग्राफ्टींग करण्यात आली. यात त्वचेचा तुकडा एका भागातून काढून दुसºया भागात प्रत्यारोपित केला जातो. 

लवकरच कृत्रिम कान लावला जाईलहा अपघात एवढा भीषण होता की तिचा डावा कानही उपटून निघाला होता. तिचा कान निकामी झाला आहे. आता लवकरच तिला कृत्रिम कान लावला जाईल. ज्यामुळे तिला चष्मा घालता येईल, दिसायलाही बरे दिसेल, असेही डॉ. पेरका यांनी सांगितले.

हेअर ट्रान्सप्लांट शक्य नाहीडोक्यावरील त्वचा पूर्णत: निघाल्याने ‘हेअर ट्रान्सप्लांट’ शक्य नाही. तिला विग वापरावा लागेल. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे. जीव वाचला हे महत्त्वाचे. या मुलीला २६ जानेवारी रोजी रुग्णालयातून सुटी देण्यात आली होती. शुक्रवारी ती फालोअपसाठी आली असताना ती पूर्णत: बरी झाल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. गजभिये यांना देण्यात आली. त्यांनी मुलीची आस्थेने चौकशी केली. तसेच सर्व डॉक्टरांचे कौतुक ही केल्याचे डॉ. पेरका म्हणाले.

टॅग्स :nagpurनागपूरdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल