शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात २.८१ लाखाच्या ई तिकिटांच्या काळाबाजाराचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 21:09 IST

दिवाळीत रेल्वेगाड्यातील गर्दी वाढल्यामुळे ई तिकिटांचा काळाबाजार करणारे दलाल सक्रिय झाले आहेत. गुरुवारी रात्री रेल्वे सुरक्षा दलाने ई तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून १.७८ लाखाच्या ११४ ई तिकीट आणि १.०३ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ठळक मुद्देदोघांना अटक : रेल्वे सुरक्षा दलाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिवाळीत रेल्वेगाड्यातील गर्दी वाढल्यामुळे ई तिकिटांचा काळाबाजार करणारे दलाल सक्रिय झाले आहेत. गुरुवारी रात्री रेल्वे सुरक्षा दलाने ई तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून १.७८ लाखाच्या ११४ ई तिकीट आणि १.०३ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.रेल्वे सुरक्षा दलाच्या गुन्हे शाखेला वरुड शहरात ई तिकिटांचा काळाबाजार सुरू असल्याची माहिती मिळाली. आरपीएफचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शिवराम सिंह, विजय पाटील, दीपक वानखेडे, किशोर चौधरी यांची चमू गठीत करण्यात आली. चमूने वरुड येथे जैन मंदिरासमोरील कल्पतरू सर्व्हिसेस नावाच्या दुकानावर धाड टाकली. दुकानाच्या मालकाने आपले नाव हेमंत गोपालराव घंगारे (३५) रा. वॉर्ड नं. १२, जैन मंदिरासमोर, वरुड, अमरावती सांगितले. त्याच्याकडून पर्सनल आयडीवरून काढलेली १८ आणि बनावट आयडीचा वापर करून काढलेली २० ई तिकिटे किंमत ३१३१९ रुपये आढळली. यापूर्वी त्याने काढलेल्या ८५ तिकीट किंमत १.३० लाख अशी एकूण १०५ तिकिटे किंमत १.६१ लाख तसेच कॉम्प्युटर, लॅपटॉप, प्रिंटर, मोबाईल असा ६१ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दुसऱ्या कारवाईत यावलकरनगर, पेट्रोल पंपाच्या मागील आर्या टुर अँड ट्रॅव्हल्सवर धाड टाकण्यात आली. दुकानाच्या मालकाने आपले नाव चेतन अशोक राऊत (२९) रा. वॉर्ड नं. ३, यावलकरनगर, पेट्रोल पंपाच्या मागे, वरुड असे सांगितले. त्याच्या जवळ आयआरसीटीसीचे लायसन्स नसल्याचे स्पष्ट झाले. दुकानाची तपासणी केली असता आरोपीने पर्सनल व फेक आयडीचा वापर करून ९ तिकिटे किंमत १७०४२ काढल्याचे आढळले. याशिवाय दुकानातील कॉम्प्युटर, प्रिंटर, मोबाईल असा एकूण ६२०९२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही आरोपींनी रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करीत असल्याची कबुली दिल्यानंतर त्यांच्या विरुद्ध रेल्वे अ‍ॅक्ट १४३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

६९ लाखाची ई तिकिटे जप्तरेल्वे सुरक्षा दलाने आॅक्टोबर महिन्यात ई तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या आरोपीविरुद्ध अभियान सुरू केले. यात आठ आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ६९ लाख ४८ हजार २५३ रुपयांच्या ३११० ई तिकिटा जप्त करण्यात आल्या. याशिवाय ४ लाख ६७ हजार ६४२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

टॅग्स :railwayरेल्वेticketतिकिट