शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

दोन हजार दिव्यांगांना मिळणार ई-स्मार्ट कार्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 12:19 IST

जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार ‘मिशन झिरो पेंडन्सी’ दिव्यांग प्रमाणपत्र विशेष मोहीम उपक्रमांतर्गत शहरातील दोन हजार दिव्यांगांना ई-स्मार्ट कार्ड मिळणार आहेत.

ठळक मुद्देआयआरसीटीसीचा पुढाकार रेल्वे प्रवासातील सुविधा मिळणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार ‘मिशन झिरो पेंडन्सी’ दिव्यांग प्रमाणपत्र विशेष मोहीम उपक्रमांतर्गत शहरातील दोन हजार दिव्यांगांना ई-स्मार्ट कार्ड मिळणार आहेत. त्याअंतर्गत महापालिका, समाज कल्याण विभाग, अपंग कल्याण विभाग आणि जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र यांच्यावतीने सोमवारी मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्थायी समिती सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात काही दिव्यांगांना ई-स्मार्ट कार्ड वितरित करण्यात आले.यावेळी महिला व बालकल्याण समिती सभापती प्रगती पाटील, उपसभापती विशाखा मोहोड, समितीच्या सदस्या मनीषा अतकरे, रश्मी धुर्वे, नगरसेवक दिनेश यादव, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, समग्र शिक्षा तथा जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्राचे समन्वयक अभिजित राऊ त आदी उपस्थित होते.विविध शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी दिव्यांगांजवळ अपंगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. मिशन झिरो पेंडन्सी उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सहा हजार दिव्यांग बांधवांना घरपोच प्रमाणपत्र देण्याची मोहीम राबविली जात आहे.आयआरसीटीसीद्वारे प्रदान करण्यात येणाºया ई-स्मार्ट कार्डमुळे दिव्यांग व्यक्तींना आॅनलाईन तिकीट सवलतीच्या दरात मिळणार आहे. तिकीटसाठीही दिव्यांगांना रांगेत उभे राहावे लागणार नाही. प्रवासादरम्यान ई-स्मार्ट कार्ड सोबत ठेवणे आवश्यक असणार आहे. भारतीय रेल्वे प्रशासनामार्फत देण्यात येणाºया प्रवास सवलतीमुळे अनेक दिव्यांगांना लाभ होणार आहे. ई-स्मार्ट कार्डमुळे दिव्यांगांना प्रवासासाठी विविध दस्तावेज बाळगण्याची गरज नसून, एका ई-स्मार्ट कार्डमुळे रेल्वे प्रवासातील सर्व सुविधांचा लाभ त्यांना घेता येणार आहे.दिव्यांग व्यक्तींना भारतीय रेल्वे प्रशासनामार्फत सुरू करण्यात आलेले युनिक आयडी कार्ड (आयआरसीटीसीद्वारे सवलत आधारित ई-तिकीट) योजनेचा लाभ घेण्याकरिता आवश्यक बाबींची पूर्तता करणे अनिवार्य आहे. ई-स्मार्ट कार्डकरिता दिव्यांगांकडून रेल्वे सवलत प्रमाणपत्र, छायाचित्र ओळख पुरावा, जन्माचा पुरावा, पत्त्याचा पुरावा, दोन पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, रेल्वे फोटो ओळखपत्र मिळविण्याकरिता संबंधित कागदपत्रांची एक छायाप्रत संच प्रमाणित (स्वयं प्रमाणित) करून दोन हजार दिव्यांग बांधवांचे दस्तावेज मागविण्यात आले. संपूर्ण दस्तावेज मनपाचा समाज कल्याण विभाग व जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र, नागपूर यांच्यावतीने तयार करून जिल्हाधिकारी नागपूर यांच्या पत्रासह रेल्वे विभागास सादर करण्यात आले.या उपक्रमाद्वारे प्राप्त होणारे दोन हजार युनिक आयडी कार्ड आयआरसीटीसीद्वारे सवलत आधारित ई-तिकीट प्रमाणपत्र दिव्यांग बांधवांना घरपोच देणे, शहरी भागातील दिव्यांगांना शासकीय टपालाद्वारे, उपरोक्त योजनेची तपशील माहिती दिव्यांग बांधवांना व्हावी याकरिता योजनेचे माहितीपत्रक तयार करणे आदीबाबत जिल्हाधिकारी अश्विन मुदगल व महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्यावतीने निर्देशित करण्यात आले आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे