शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात अधिवेशन काळात तीन हजारांवर पोलिसांना ताप, सर्दी व डोकेदुखीचा त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 10:26 IST

राज्यातील ठिकठिकाणाहून हिवाळी बंदोबस्तासाठी आलेल्या तीन हजारांवर पोलिसांना नागपूरच्या थंडीचा तडाखा बसला आहे.

ठळक मुद्देदररोज चारशेवर पोलिसांवर केला जातो उपचार

नरेश डोंगरेआॅनलाईन लोकमतनागपूर : राज्यातील ठिकठिकाणाहून हिवाळी बंदोबस्तासाठी आलेल्या तीन हजारांवर पोलिसांना नागपूरच्या थंडीचा तडाखा बसला आहे. गेल्या आठ दिवसात पोलिसांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या डॉक्टरांनी ३१२० कर्मचाऱ्यांवर विविध प्रकारचे उपचार केले आहेत.हिवाळी बंदोबस्तासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून दरवर्षी मोठ्या संख्येत महिला-पुरूष पोलीस कर्मचारी-अधिकारी नागपुरात येतात. यावर्षी बंदोबस्तासाठी बाहेरून आलेल्या पोलिसांची संख्या कमी आहे. मात्र, जे काही बाहेरून आले त्यांना नागपूरची थंडी थरथरवणारी ठरली आहे. भल्या सकाळी उठून रात्रीपर्यंत बंदोबस्तात तैनात राहावे लागत असल्यामुळे आणि आपले गाव सोडून आल्याने वातावरण तसेच खाण्यापिण्यात बदल झाल्याने अनेक पोलिसांना ताप, सर्दी, पडसे, खोकला, ओकाऱ्या, डोकेदुखी व घसादुखीचा त्रास होत आहे. त्यामुळे बंदोबस्तावरील बरेचसे पोलीस हैराण आहेत. रोज सुमारे ४०० ते ५०० रुग्ण उपचार घेत आहेत.विशेष म्हणजे, बाहेरून बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांना दरवर्षीच्या तुलनेत यंदा पोलीस आयुक्तालयातून निवास आणि जेवणाची चांगली व्यवस्था करून देण्यात आली आहे. अवघ्या दहा रुपयात दोन्ही वेळेला पोटभर आणि गरम जेवण, अंथरायला गाद्या, पांघरायला ब्लँकेट उपलब्ध करून देण्यात आले आहे. आंघोळीला गरम पाण्याची व्यवस्था आहे. मात्र, एकाच वेळी सर्वांनाच कर्तव्यावर हजर राहावे लागत असल्याने जे आधी नंबर लावतील त्यांचे ठीक आहे. काही जणांना गैरसोयीचाही सामना करावा लागत आहे.९ डॉक्टरांसह ५५ कर्मचारीबंदोबस्तावरील पोलिसांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी यंदा आरोग्य सुविधांचेही चांगले नियोजन करण्यात आले आहे. ९ डॉक्टर, ९ पारिचारिका आणि ३७ कर्मचारी असे एकूण ५५ अधिकारी-कर्मचारी बंदोबस्तांवरील पोलिसांच्या आरोग्यांची काळजी घेत आहेत. त्यांच्या मदतीला ६ अ‍ॅम्बुलन्स आहेत. त्यात वायरलेस सेटही आहेत. पोलीस अधिकारी असो अथवा कर्मचारी त्याला काही त्रास होत असल्याची माहिती कंट्रोल रूममधून मिळताच तेथे जाऊन वैद्यकीय पथके तातडीने उपचार करीत आहेत.परिमंडळ दोनचे उपायुक्त राकेश ओला आरोग्य सेवा-सुविधेवर विशेष नजर ठेवून आहेत. बंदोबस्तात तैनात असलेल्या अनेक पोलिसांनी कडाक्याच्या थंडीमुळे प्रकृती अस्वास्थ्याबद्दलची कुरबुर करतानाच तातडीने चांगले उपचार मिळत असल्याबद्दल लोकमतशी बोलताना समाधानही व्यक्त केले आहे.

 

 

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७