शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

दुरांतो एक्सप्रेसमध्ये ८०.२७ लाखांचे हिरेजडित सोन्याचे दागिने जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 20:17 IST

मुंबई-नागपुर दुरांतो एक्स्प्रेसने सोने-चांदी आणि हिऱ्याचे ८० लाख २७ हजार ७७० रुपये किमतीच्या दागिन्यांची २९ पाकिटे आणणाऱ्या आरोपीला रेल्वे सुरक्षा दलाच्या गुन्हे शाखेने गुरुवारी सकाळी नागपूर रेल्वेस्थानकावर अटक केली.

ठळक मुद्देआरपीएफच्या गुन्हे शाखेची कामगिरीदागिन्यांसह आरोपी आयकर विभागाच्या स्वाधीन

आॅनलाईन लोकमतनागपूर : मुंबई-नागपुर दुरांतो एक्स्प्रेसने सोने-चांदी आणि हिऱ्याचे ८० लाख २७ हजार ७७० रुपये किमतीच्या दागिन्यांची २९ पाकिटे आणणाऱ्या आरोपीला रेल्वे सुरक्षा दलाच्या गुन्हे शाखेने गुरुवारी सकाळी नागपूर रेल्वेस्थानकावर अटक केली. दरम्यान एका कुरिअर कंपनीच्या आड हे दागिने आणल्याची माहिती आरोपीने दिली असून, दागिन्यांसह आरोपीला आयकर विभागाच्या स्वाधीन करण्यात आले आहे.रेल्वे सुरक्षा दलाच्या गुन्हे शाखेला रेल्वेगाडी क्रमांक १२२८९ मुंबई-नागपुर दुरांतो एक्स्प्रेसमध्ये श्याम बंकुवाले नावाचा व्यक्ती सोन्याची पाकिटे आणणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. गुन्हे शाखेने ही माहिती कसारा येथील आरपीएफला दिली. त्यानुसार कसारा येथील आरपीएफ जवान संजय पाटील आणि इगतपुरी येथील आरपीएफचा जवान सज्जन गोरे हे दुरांतो एक्स्प्रेसमध्ये चढले. त्यांनी आरक्षणाच्या यादीतून श्याम हे नाव शोधून काढले असता आरोपी एस-७, बर्थ ४९ वर प्रवास करीत असल्याचे आढळले. त्यांनी आरोपीवर नागपुरात येईपर्यंत पाळत ठेवली. नागपुरात दुरांतो एक्स्प्रेस सकाळी ९.१५ वाजता नागपूर रेल्वेस्थानकावर आल्यानंतर आरपीएफचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक भगवान इप्पर, आरपीएफ ठाण्याचे निरीक्षक वीरेंद्र वानखेडे, संजय पुरकाम, विजय पाटील, दीपक वानखेडे, किशोर चौधरी, नीळकंठ गोरे यांनी आरोपीला सोन्याच्या २९ पाकिटांसह अटक केली. आरोपीने आपले नाव श्याम बंकुवाल (३८) रा. अकोला असे सांगून आपण इंद्रायणी कुरियर अँड लॉजिस्टिक सर्व्हिससाठी काम करीत असल्याचे सांगितले. या कामासाठी आठ हजार रुपये वेतन आणि प्रत्येक फेरीमागे ७०० रुपये मिळत असल्याची माहिती त्याने दिली. आरपीएफने आयकर विभागाचे अधिकारी आणि सोन्याचे मूल्यमापन करणाऱ्या तज्ज्ञांना बोलावले. यात २ किलो ३०९ ग्रॅम सोन्याचे दागिने, २९.७४ कॅरेट हिºयाचे दागिने एकूण किंमत ७८ लाख ७६ हजार २०३ रुपये आणि चांदीचे ३ किलो ६०१ ग्रॅम चांदीचे दागिने किंमत १ लाख ५१ हजार ५६७ यांचा समावेश होता. मूल्यमापन केल्यानंतर जप्त केलेले दागिने आरोपीसह आयकर विभागाच्या स्वाधीन करण्यात आले.हवालाची रक्कम आयकर विभागाकडे सुपूर्दबुधवारी रात्री ८.३० वाजता नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसमध्ये आरपीएफच्या गुन्हे शाखेने पकडलेली ३० लाख रुपयांची हवालाची रक्कम गुरुवारी आरोपीसह आयकर विभागाच्या सुपूर्द करण्यात आली.

टॅग्स :nagpurनागपूर