शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ठेवीदारांच्या कोट्यवधी रुपयांची अफरातफर : संतप्त जमावाचा कोतवाली ठाण्याला घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 00:06 IST

ठेवीदारांच्या कोट्यवधी रुपयांची अफरातफर करून जय श्रीराम अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष खेमचंद मेहरकुरे बेपत्ता झाल्याने संतप्त झालेल्या ठेवीदारांनी कोतवाली पोलीस ठाण्याला सोमवारी घेराव घातला. माहिती देऊनही पोलिसांनी प्रकरण थंडपणाने हाताळल्यामुळे अनेकांना आर्थिक फटका देणारा संस्थाध्यक्ष बेपत्ता झाल्याचा जमावाने आरोप केला. पोलिसांकडून दखल घेतली जात नसल्याने संतप्त ठेवीदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे कोतवाली ठाणे परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी सावरासावर करूनही ठेवीदारांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. मात्र, रात्री १०.३० पर्यंत यश न आल्याने पोलीस ठाण्यासमोर गुंतवणूकदार ठिय्या देऊन होते.

ठळक मुद्देपतसंस्थेचा अध्यक्ष बेपत्ता : प्रचंड तणाव, पोलिसांची सावरासावर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ठेवीदारांच्या कोट्यवधी रुपयांची अफरातफर करून जय श्रीराम अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष खेमचंद मेहरकुरे बेपत्ता झाल्याने संतप्त झालेल्या ठेवीदारांनी कोतवाली पोलीस ठाण्याला सोमवारी घेराव घातला. माहिती देऊनही पोलिसांनी प्रकरण थंडपणाने हाताळल्यामुळे अनेकांना आर्थिक फटका देणारा संस्थाध्यक्ष बेपत्ता झाल्याचा जमावाने आरोप केला. पोलिसांकडून दखल घेतली जात नसल्याने संतप्त ठेवीदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे कोतवाली ठाणे परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी सावरासावर करूनही ठेवीदारांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. मात्र, रात्री १०.३० पर्यंत यश न आल्याने पोलीस ठाण्यासमोर गुंतवणूकदार ठिय्या देऊन होते.तुकडोजी चौकाजवळच्या गणेशनगरात जय श्रीराम अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे कार्यालय असून, संस्थेचे अध्यक्ष खेमचंद मेहरकुरे आहे. १५ वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या या संस्थेत हजारो गुंतवणूकदार सभासद (खातेधारक) आहेत. अल्पावधीत मोठ्या व्याजाचे आमिष संस्थाध्यक्ष आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्तीकडून मिळाल्याने शेकडो जणांनी या संस्थेत आपली रक्कम गुंतविली. कुणी फिक्स डिपॉझिट तर कुणी डेली कलेक्शन करणाऱ्याच्या हातात रक्कम दिली. कोट्यवधींच्या ठेवी संस्थेत जमा झाल्या असताना संस्थाध्यक्षाने एका अवैध सावकारी करणाऱ्या व्यक्तीला तसेच त्याच्या जवळच्या व्यक्तींना या संस्थेशी जोडले आणि नंतर संस्थेची आर्थिक अवस्था बिघडत गेली. दरम्यान, रक्कम गुंतविणाऱ्यांची मुदत पूर्ण झाल्याने ठेवीदारांनी आपली रक्कम परत मागण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात चकरा मारणे सुरू केले तर संस्थाध्यक्ष मेहरकुरेने वेगवेगळ्या थापा मारून त्यांना टाळणे सुरू केले. दुसरीकडे मेहरकुरेने मुख्य कार्यालयासह शहरातील अन्य भागात उघडलेल्या संस्थेच्या शाखाही बंद केल्या. दरम्यान, मेहरकुरेची थापेबाजी लक्षात आल्याने १४ फेब्रुवारीला ठेवीदारांनी कोतवाली ठाण्यात धाव घेतली. यावेळी मेहरकुरेंनी १ एप्रिलला सर्वांची रक्कम परत करण्याचे आश्वासन दिले. विशेष म्हणजे, पोलिसांनीही मेहरकुरेवर विश्वास ठेवण्याचा संतप्त ठेवीदारांना सल्ला दिला.आज १ एप्रिलला अनेक ठेवीदारांनी मेहरकुरेंशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो आऊट ऑफ रेंज असल्याचे लक्षात आल्याने ठेवीदारांनी दुपारी ४ च्या सुमारास कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेतली. संस्थेचे काही पदाधिकारी आणि एजंटही ठेवीदारांच्या सोबत होते.त्यांनी संस्थाध्यक्ष मेहरकुरे आणि त्याच्या संपर्कातील अवैध सावकाराविरुद्ध कडक कारवाईची मागणी लावून धरली. जोरदार नारेबाजी करीत रात्री १०.३० वाजेपर्यंत कोतवाली ठाण्यासमोर मोठा जमाव उभा होता. त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न पोलीस अधिकारी करीत होते.ठाण्याच्या आवारातच हाणामारीठेवीदार आणि त्यांच्या नातेवाईकांचा रोष लक्षात घेता पोलिसांनी मेहरकुरेसह संस्थेच्या पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही पोलीस ठाण्यात बोलवून घेतले. मेहरकुरे गायब असल्याने येण्याचा प्रश्नच नव्हता. एक महिला व्यवस्थापक तेथे पोहचली. तिच्या कार्यशैलीने आधीच चिडून असलेल्या ठेवीदार तसेच एजंटस्नी तिच्यावरच रोष व्यक्त केला. एका महिलेने चक्क तिच्यावर धाव घेतली. त्यानंतर व्यवस्थापिका आणि त्या महिलेत ठाण्याच्या आवारातच जोरदार हाणामारी झाली. या प्रकारामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली होती.पोलिसांची झाली गोचीया प्रकरणात संस्थाध्यक्ष व त्याच्या साथीदारावर दाखविलेल्या विश्वासामुळे आता पोलिसांचीही गोची झाली आहे. पोलिसांनी मेहरकुरे आणि त्याच्यासोबत भागीदारी करणारा विठ्ठल मेहर तसेच त्याच्या साथीदारांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी संस्थेचे उपाध्यक्ष योगेश चरडे यांनी २८ मार्चला कोतवाली ठाण्यात दुसरी तक्रार केली होती. मात्र, पोलिसांनी १५ मार्च तसेच २८ मार्चच्या तक्रारीची दखल घेणे तर सोडा मेहरकुरे, मेहर आणि त्यांच्या साथीदारांवर नजर ठेवण्याचेही टाळले. त्याचमुळे मेहरकुरे आणि त्याचे साथीदार शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधींची रक्कम गिळंकृत करून पळून गेले. परिणामी पोलिसांबाबतही ठेवीदार, पदाधिकारी आणि संस्थेच्या एजंटमध्ये रोष आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीInvestmentगुंतवणूक