शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लाेकसभा निवडणुकीमुळे गुरुजींचा ‘सेट’चा मार्ग अडचणीत

By निशांत वानखेडे | Updated: April 1, 2024 16:02 IST

युपीएससी, सीए प्रमाणे ही परीक्षाही पुढे ढकलण्याची मागणी : अनेकांची निवडणुकीच्या कामावर ड्युटी

नागपूर : लाेकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर अनेक निर्धारित परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करून त्या पुढे ढकलण्यात आल्या. युपीएससी, सीए आदी परीक्षा पुढे करण्यात आल्या. त्याप्रमाणे सहायक प्राध्यापक पात्रता परीक्षा (सेट) पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी प्रविष्ट उमेदवारांकडून हाेत आहे.

पुणे विद्यापीठातर्फे येत्या ७ एप्रिल राेजी सेटची परीक्षा घेण्यात येत आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातून जवळपास ३ लाख उमेदवार प्रविष्ट आहेत. यातील बहुतेक उमेदवार अनुदानित, विना अनुदानित शाळा-महाविद्यालयात कंत्राटी तत्वावर कार्य करीत आहेत. या बहुतेक शाळा-महाविद्यालयांचे शिक्षक सध्या निवडणुकीच्या कामावर लागले आहेत. निवडणूक काम हे संवेदनशील असते व त्यात झालेली कुठलीही चूक अडचणीत टाकणारी असते. यातील बहुतेक शिक्षक सेटसाठी प्रविष्ट असल्याने त्यांच्यासाठी परीक्षेची तयारी करणे अडचणीचे तर आहेच, पण निवडणुकीचे काम साेडून परीक्षेसाठी जाणेही अडचणीचे हाेणार असल्याने या शिक्षकांची  चिंता वाढली आहे. परीक्षेस मुकले तर यावर्षी संधी हुकेल, ही भीती त्यांना आहे.

युपीएससी पूर्व परीक्षा व आयाेगाअंतर्गत असलेली अभियांत्रिकी सेवा परीक्षा २६ मे २०२४ राेजी निर्धारित हाेती. मात्र लाेकसभा निवडणुकीमुळे ही परीक्षा पुढे ढकलत १६ जूनला निर्धारित करण्यात आली आहे. दुसरीकडे चार्टर्ड अकाउंटंट (सीए) ची परीक्षा सुद्धा पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे या परीक्षांप्रमाणे सेटची परीक्षासुद्धा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी अनेक उमेदवारांनी लाेकमतशी बाेलताना केली. यामुळे निवडणुकीचे कामही साेडावे लागणार नाही आणि तयारी करायलाही वेळ मिळेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :nagpurनागपूर