शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

 शिक्षण खात्यातील संभ्रमामुळे आरटीई प्रवेशासाठी पालकांना मनस्ताप !

By गणेश हुड | Updated: May 3, 2023 18:56 IST

Nagpur News  शिक्षणहक्क कायद्यांतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठी शहरात ऑनलाइन प्रवेश निश्चित करताना जातीचा दाखला अर्ज करण्यापूर्वी काढलेला नाही.  तसेच उत्पन्नाचा दाखला मागील वर्षाचा नाही. अशी अफलातून कारण पुढे करून प्रवेश नाकारला जात असल्याने पालकांचा मनस्ताप वाढला आहे. 

गणेश हूड नागपूर :  जातीचा दाखला कधी काढला यावरुन जात ठरत नाही. मात्र शिक्षण खात्यातच याबाबत संभ्रम आहे.  शिक्षणहक्क कायद्यांतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठी शहरात ऑनलाइन प्रवेश निश्चित करताना जातीचा दाखला अर्ज करण्यापूर्वी काढलेला नाही.  तसेच उत्पन्नाचा दाखला मागील वर्षाचा नाही. अशी अफलातून कारण पुढे करून प्रवेश नाकारला जात असल्याने पालकांचा मनस्ताप वाढला आहे. 

आरटीई अंतर्गत नागपूर जिल्हयात ६५०० जागांवर प्रवेश दिला जाणार आहे. तर यासाठी तब्बल ३६ हजार अर्ज आले आहेत. अशीच परिस्थिती राज्यातील आहे. जागा कमी अन् अर्ज अधिक यामुळे प्रवेशासाठी पात्र असूनही नको त्या कारणासाठी विद्यार्थ्यांचे प्रवेश नाकारले जात आहेत. आरटीई अंतर्गत प्रवेश मिळवण्यासाठी रहिवाशी दाखला, जात प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला( खुल्या प्रवर्गासाठी), जन्माचा दाखला आदी कागदपत्राची आवश्यकता आहे. ऑनलाईन अर्ज करताना ही कागदपत्रे मागितली जात नाही.  प्रवेशास पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे माहिती कळवली कळविल्यानंतर प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी दिलेल्या मुदतीमध्ये पडताळणी समितीकडून कागदपत्रांची तपासणी करून प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. कागदपत्रांची पडताळणी करताना जातीचा दाखला ऑनलाईन अर्ज केल्यानंतरचा असल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला जात आहे. जातीचा दाखला कधी काढला यावरून जात ठरत नाही. असे असतानाही  शाळांकडून प्रवेश नाकारला जात असल्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला प्राप्त झाल्या आहेत. तसेच २०२२-२३ या वर्षाचा उत्पन्नाचा दाखला जोडल्याने अनेकांचे प्रवेश नाकारण्यात आले आहे. यामुळे पात्र असूनही विद्यार्थ्यांना प्रवेशाला मुकावे लागत असल्याने पालकवर्गात संताप व्यक्त केला जात आहे.शिक्षण विभागाने मागितले शासनाचे मार्गदर्शन आरटीई अंतर्गत आरक्षित संवर्गातून प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करताना जातीचा दाखला कधीचा हवा, याबाबतचा कुठलाही उल्लेख नाही. तसेच उत्पन्नाचा दाखला २०२१-२२ या वर्षाचा की  २०२२-२३ या वर्षाचा हवा याबाबत स्पष्ट निर्देश नाही. मात्र कागदपत्राची पडताळणी करताना जातीचा दाखला अर्जानंतरचा असल्याने प्रवेश नाकारले जात असल्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शासनाला पत्र पाठवून मार्गदर्शन मागितले आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी रोहीणी कुंभार यांनी याला दुजोरा दिला.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र