शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात आवक घटल्याने आंबा खातोय भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 11:34 IST

उन्हाळ्यात आंब्याची चव घेण्यासाठी सर्वच आतूर असतात. पण आंध्र प्रदेशात झालेल्या वादळी पावसामुळे पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत येणारी आंब्याची आवक कमी होऊन भाव वधारले आहेत.

ठळक मुद्देवादळी पावसामुळे आंध्रमधे नुकसानवाढीव भावामुळे ग्राहकांची पाठ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उन्हाळ्यात आंब्याची चव घेण्यासाठी सर्वच आतूर असतात. पण आंध्र प्रदेशात झालेल्या वादळी पावसामुळे पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत येणारी आंब्याची आवक कमी होऊन भाव वधारले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांकडून काहीशी नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. वाढत्या भावामुळे आंब्याची गोडी कमी झाली आहे.बेमोसमी हवामान, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे फळंंचा राजा असलेल्या आंब्याच्या पिकाला चांगलाच फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे आंब्याचे मोठे नुकसान झाल्याने परिणामी आंध्र प्रदेशातून कळमना बाजारात येणाऱ्या बैंगनफल्ली आंब्याची आवक कमी झाली असून भाव ठोकमध्ये दर्जानुसार २५ ते ४० रुपयांवर पोहोचले आहे. किरकोळमध्ये आंबा ८० ते १०० रुपये किलो विकण्यात येत आहे.

वादळी तडाख्याचा परिणामकृषी उत्पन्न बाजार समितीतील फळे अडतिया असोसिशनचे अध्यक्ष आनंद डोंगरे यांनी सांगितले की, मागील हंगामाचा विचार केल्यास यंदा आंब्याची आवक कमी असल्याने ग्राहकांना पसंतीचे आंबे मिळणे कठीण झाले आहे. तुलनात्मरीत्या यंदा आंब्याचे ३० टक्केच उत्पादन आहे. यासोबत वादळी पावसामुळे १० टक्के आंबा खराब झाला आहे. वादळी तडाख्याचा उत्पादनावर परिणाम झाला आहे. आंध्र प्रदेशातून कळमन्यात गेल्या १५ दिवसांपासून ५ ते ८ टन क्षमतेच्या १२० ते १२५ गाड्या येत आहेत. आवक मे महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू राहील. याशिवाय भिवापूर, कुही, मांढळ, पवनी, लाखांदूर आणि गोंदिया भागातून गावरान लंगडा दसेरी आंब्याची आवक सुरू आहे. गेल्यावर्षीच्या २० ते २५ टेम्पोच्या तुलनेत यंदा केवळ २ ते ३ टेम्पो कळमन्यात येत आहेत. तसेच कोकणातील हापूस आंबे यंदा कमी प्रमाणात येत आहेत. एक डझन पेटीचे भाव ४०० ते ४५० रुपये आहेत.डोंगरे म्हणाले, मे महिन्यानंतर उत्तर प्रदेशातून दसेरी आंबे बाजारात येतील. पण या राज्यातही वादळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. यंदा ५० टक्के आंबे बाजारात येण्याचा अंदाज आहे. तपत्या उन्हामुळे जमिनीतील उष्णता वाढत आहे. त्यामुळे आंब्याची वाढ व दर्जा घसरत चालला आहे. आंबा उत्पादन कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च भरून काढणे अवघड झाले आहे. समाधानकारक बहर न आल्याने आंबा उत्पादकांकडूनही चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्याचा उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

टॅग्स :Mangoआंबा