शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात संघाच्या कार्याचा गौरव असल्याने वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 06:00 IST

प्रशासनाचे मौन : कुलगुरूंच्या राजीनाम्याची मागणी

नागपूर/मुंबई : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बीए द्वितीय वर्षाच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमात देश उभारणीत संघाचे स्थान यावर विद्यार्थ्यांना चौथ्या सत्रात धडे शिकविण्यात येणार आहे. त्यावरून वाद उफाळला आहे. मंगळवारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यांनी याला जोरदार विरोध दर्शविला. काही संघटनांनी कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांना निवेदन देऊन इशाराही दिला.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी टिष्ट्वटरवरून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी म्हटले आहे की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राष्ट्र निर्माण कार्यात भूमिका हे शिकविताना, आरएसएसने १९४२ च्या चले जाव आंदोलनाचा विरोध केला होता. भारतीय संविधान व राष्ट्रध्वजाचा विरोध केला होता, हे सुद्धा विद्यार्थ्यांना शिकविण्यात यावे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीसुद्धा आपल्या टिष्ट्वटमध्ये म्हटले की, ज्यांनी इंग्रजांची साथ दिली, स्वातंत्र्य संग्रामात गद्दारी केली, ज्यांच्या विचारामुळे महात्मा गांधींची हत्या झाली, त्यांचा इतिहास आता शिकविला जाणार आहे.

कुलगुरू डॉ. काणे व अन्य पदाधिकाऱ्यांनी यावर कुठलेच भाष्य केलेले नाही.एमए इतिहासाच्या अभ्यासक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघासंदर्भात शिकविले जात आहे. एमएच्या चौथ्या सत्रात आधुनिक विदर्भाचा इतिहास या विषयाच्या चौथ्या युनिटमध्ये संघाचा मुद्दा आहे. पदवी विद्यार्थ्यांना याची माहिती व्हावी म्हणून बीएच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला आहे. यात कुठलेही राजकारण नाही, असे मानव्यशास्त्र विभागाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद शर्मा यांनी सांगितले.देश निर्माणात ‘आरएसएस’चे स्थान...काही दिवसांपूर्वी विद्यापीठाने बीए द्वितीय वर्षाच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमात बदल करण्यासाठी मंजुरी दिली होती. अभ्यासक्रमात कम्युनिझम उदय व विकास, क्रिप्स मिशन व कॅबिनेट मिशन प्लॅन यांचा समावेश करण्यात येणार होता. मात्र, अभ्यासक्रमात बदल करताना कम्युनिझमऐवजी ‘देश निर्माणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्थान’, या विषयाचा समावेश करण्यात आला आहे. संपूर्ण अभ्यासक्रमातून कम्युनिझमचा इतिहास काढून टाकण्यात आला आहे.अन्य संघटनांनीही केला विरोधशिवाजी विद्यार्थी संघ, एनएसयूआय, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस यांनीही निवदेनाद्वारे तीव्र विरोध दर्शवित कुलगुरूंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.संघाचा राष्ट्रनिर्मितीशी संबंध काय?ब्रिटीशांबरोबर संगनमत करून स्वातंत्र्य संग्रामाचा केलेला विरोध, स्वातंत्र्य संग्रामात भाग घेण्यापासून इच्छुक स्वयंसेवकांना परावृत्त करणे, १९४२ चे चलेजाव आंदोलन हाणून पाडण्याकरता ब्रिटीशांना केलेली मदत, हे संघाच्या देशविरोधी कारवायांचे प्रतिक आहेत. संविधानाऐवजी मनुस्मृती ग्रंथाचा केलेला पुरस्कार, भारतीय तिरंगा झेंड्याला अशुभ म्हणून ५२ वर्षे स्वत:च्या कार्यालयावर न फडकवणे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य राहिलेले आहे.- अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

टॅग्स :nagpurनागपूरRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ