शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

दर्जेदार वैद्यकीय शिक्षकांची कमतरता : एम्सचे अध्यक्ष दवे यांची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 01:21 IST

भारतात ‘एम्स’ची संख्या वाढत आहे. ‘एम्स’ वर कौशल्यप्राप्त व दर्जेदार डॉक्टर तयार करण्याची जबाबदारी आहे. परंतु देशात दर्जेदार वैद्यकीय शिक्षकांची कमतरता आहे, अशी खंत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थचे (एम्स) अध्यक्ष म्हणून नियुक्त झालेले डॉ. पी. के. दवे यांनी आयोजित पत्रपरिषदेत व्यक्त केली.

ठळक मुद्देनागपूर एम्सची केली पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतात ‘एम्स’ची संख्या वाढत आहे. ‘एम्स’ वर कौशल्यप्राप्त व दर्जेदार डॉक्टर तयार करण्याची जबाबदारी आहे. परंतु देशात दर्जेदार वैद्यकीय शिक्षकांची कमतरता आहे, अशी खंत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थचे (एम्स) अध्यक्ष म्हणून नियुक्त झालेले डॉ. पी. के. दवे यांनी आयोजित पत्रपरिषदेत व्यक्त केली.डॉ. दवे यांनी मंगळवारी मिहानमध्ये सुरू असलेल्या एम्सच्या बांधकामाचे व मेडिकलमध्ये सुरू असलेल्या एम्सच्या एमबीबीएस वर्गाचे निरीक्षण केले. मूळचे गुजरात येथील डॉ. दवे एम्स दिल्लीचे विद्यार्थी आहेत. एम्स दिल्लीच्या संचालकपदाची जबाबदारी सांभाळली आहे. आर्थाेपेडिक सर्जन असलेले डॉ. दवे यांच्याकडे आता नागपूर एम्सच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या निमित्त ते नागपुरात आले असताना पत्रकारांशी बोलत होते. यावेळी एम्सच्या संचालक डॉ. विभा दत्ता व उपसंचालक मनोजकुमार बक्षी उपस्थित होते.रुग्णालायाच्या इमारतीच्या ‘कन्सेप्ट’मध्ये बदलडॉ. देव म्हणाले, पूर्वीच्या आणि आत्ताच्या रुग्णालयाच्या इमारतीच्या ‘कन्सेप्ट’ म्हणजेच संकल्पनेत बदल झाला आहे. आता रुग्णालयात अपघाताचा किंवा सामान्य रोगाचा रुग्ण आल्यास त्याच्यावर उपचार कुठे होतील, लिफ्ट कुठे असावी, ‘रॅम्प’ या सर्व बारीकसारीक गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक झाले आहे. नागपूर ‘एम्स’च्या बांधकामातही यासर्व गोष्टींकडे विशेष लक्ष दिले जात आहे.आरोग्य सेवेच्या दृष्टीने प्राथमिक आरोग्य केंद्र महत्त्वाचेआरोग्य सेवेच्या दृष्टीने प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा व जिल्हा रुग्णालय महत्त्वाचे असते. लोकांचे आरोग्यमान सुधारण्यासाठी उपयुक्त ठरते. परंतु तज्ज्ञ डॉक्टर व सोयींअभावी रुग्ण शहरात येऊन शासकीय रुग्णालयात गर्दी करतात. यामुळे अनेकवेळा रुग्णसेवा विस्कळीत होते. म्हणूनच प्राथमिक आरोग्य केंद्राचे बळकटीकरण करणे, नागरिकांना आरोग्यविषयक धडे देणे आवश्यक आहे. सरकारने यात लक्ष घालणे आवश्यक असल्याचे असे मतही डॉ. दवे यांनी व्यक्त केले.

 

टॅग्स :Medicalवैद्यकीयdoctorडॉक्टर