शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सोईंअभावी नागपूर विमा रुग्णालयातील रुग्णसेवा प्रभावित 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 23:14 IST

रिक्त पदे, औषधांचा तुटवडा, यंत्रसामुग्रीचा अभाव, डॉक्टरांअभावी बंद पडत चाललेले वॉर्ड यामुळे कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवा देणाऱ्या राज्य कामगार विमा योजना रुग्णालयातील रुग्णसेवा प्रभावित झाल्याचे ताशेरे एस. पी. तिवारी यांनी ओढले. रुग्णालय चालविण्यास राज्य शासन सक्षम नसेल तर तसे सांगावे, राज्य कामगार विमा योजना व कुटुंब कल्याण (ईएसआयसी) हे रुग्णालय चालवायला घेईल, असेही ते म्हणाले.

ठळक मुद्देएस. पी. तिवारी यांनी केली पाहणी : रिक्त पदे, औषधांचा तुटवडा, यंत्रांच्या अभावाकडे वेधले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रिक्त पदे, औषधांचा तुटवडा, यंत्रसामुग्रीचा अभाव, डॉक्टरांअभावी बंद पडत चाललेले वॉर्ड यामुळे कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवा देणाऱ्या राज्य कामगार विमा योजना रुग्णालयातील रुग्णसेवा प्रभावित झाल्याचे ताशेरे एस. पी. तिवारी यांनी ओढले. रुग्णालय चालविण्यास राज्य शासन सक्षम नसेल तर तसे सांगावे, राज्य कामगार विमा योजना व कुटुंब कल्याण (ईएसआयसी) हे रुग्णालय चालवायला घेईल, असेही ते म्हणाले.‘ईएसआयसी’ महामंडळाचे सदस्य तिवारी यांनी शुक्रवारी सोमवारपेठेतील राज्य कामगार विमा योजना रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी रुग्णालयाची अधोगती पाहून आश्चर्य व्यक्त केले. ‘लोकमत’शी बोलताना तिवारी म्हणाले, गेल्या कित्येक वर्षांपासून रुग्णालयातील रिक्त पदे भरण्यातच आली नाहीत. साधारण ३५ ते ४० टक्के पदे रिक्त आहेत. रुग्णालयात डॉक्टरांची संख्या फारच कमी आहे. औषधांचा तुटवडा आहे. यंत्रसामुग्रीचा अभाव आहे. राज्य शासनाचे सहकार्य नसल्यामुळेच या समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्यांमुळेच रुग्ण दाखल केले जात नाही. रुग्णांना खासगी इस्पितळांमध्ये पाठविले जाते. रुग्णालयात खाटांची संख्या १३० आहे परंतु ४० वर रुग्ण भरती नाहीत. कामगार रुग्णांच्या वेतनातून पैसे कापूनही त्यांना योग्य पद्धतीची आरोग्य सेवा मिळत नसेल तर त्यांचे संतापणे समजू शकतो. यावर वैद्यकीय अधीक्षकांचे येथील रुग्ण ‘अ‍ॅग्रेसिव्ह’ आहेत असे म्हणणे चुकीचे आहे.तिवारी म्हणाले, रुग्णालयाच्या समस्यांसाठी पुढील महिन्यात, जानेवारीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री व कामगार मंत्री यांच्याशी भेट घेणार आहे. रुग्णालयातील ज्या समस्या आहेत त्याचे निराकरण करण्यासाठी आम्ही काय करावे ते सांगावे, असा प्रस्तावही त्यांना देऊ. राज्य शासन रुग्णालय चालविण्यास सक्षम नसेल तर त्यांनी ‘ईएसआयसी’कडे रुग्णालयाचा कारभार सोपवावा, असेही ते म्हणाले. या भेटी दरम्यान संजय कटकमवार, अजय यादव, अमर मुखी यांच्यासह रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. मोना देशमुख, निवासी वैद्यकीय अधिकारी भावना चौधरी व वरिष्ठ डॉक्टर उपस्थित होते.बुटीबोरी रुग्णालयाचे काम प्रगतिपथावरबुटीबोरी येथे प्रस्तावित असलेल्या २०० खाटांचे कामगार रुग्णालयाचे काम प्रगतिपथावर आहे. बांधकामाच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. गडचिरोली, भंडारा, यवतमाळ, वाशीम येथील कामगार रुग्णांनाही वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी प्रयत्न केला जात आहे. रुग्णालयातील समस्यांच्या निराकरणासाठी रुग्णालयाला भेटी देत राहील, असेही तिवारी म्हणाले.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलEmployeeकर्मचारी