शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

आंतरधर्मीय विवाहामुळे महिलेची जात बदलत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 21:47 IST

केवळ दुसऱ्या धर्माच्या किंवा जातीच्या पुरुषाशी विवाह केल्यामुळे महिलेची जात आपोआप बदलत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांनी नुकताच एका प्रकरणात दिला.

ठळक मुद्देहायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय : स्वत: त्याग करणे आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केवळ दुसऱ्या धर्माच्या किंवा जातीच्या पुरुषाशी विवाह केल्यामुळे महिलेची जात आपोआप बदलत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांनी नुकताच एका प्रकरणात दिला.ख्रिश्चन धर्माच्या पुरुषाशी विवाह केल्यामुळे आणि ख्रिश्चन प्रथा-परंपरा पाळत असल्यामुळे महार जातीच्या एका महिलेला जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अनुसूचित जाती प्रवर्गाचे वैधता प्रमाणपत्र नाकारले होते. परिणामी, त्या महिलेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने ती याचिका निकाली काढताना हा निर्णय दिला. केवळ प्रगत धर्म किंवा जातीमधील पुरुषाशी लग्न केल्यामुळे अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती प्रवर्गात जन्मलेल्या महिलेची जात आपोआप बदलत नाही. जात जन्माने मिळते व ती लग्नामुळे आपोआप बदलत नाही. याचिकाकर्त्या महिलेने स्वत: बाप्तिस्मा घेऊन ख्रिश्चन धर्म स्वीकारला नाही. तिने केवळ ख्रिश्चन पुरुषाशी लग्न केले. ती ख्रिश्चन प्रथा-परंपरा पाळत असली तरी तिची जात बदलत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.किरणलता सोनटक्के असे याचिकाकर्त्या महिलेचे नाव असून, त्या नागपुरातील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात स्टाफ नर्स आहेत. त्यांना २३ ऑक्टोबर १९९० रोजी कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी महार जातीचे प्रमाणपत्र जारी केले. आता, उच्च न्यायालयाने त्यांना अनुसूचित जाती प्रवर्गाचे वैधता प्रमाणपत्रही जारी करण्याचा आदेश पडताळणी समितीला दिला आहे. सोनटक्के यांचा जन्म महार जातीमध्ये झाला असून, त्यांच्याकडे याचे राज्यघटनापूर्व काळातील पुरावे आहेत. त्यामुळे त्या अनुसूचित जाती प्रवर्गाचे लाभ मिळण्यास पात्र आहेत, असे न्यायालयाने जाहीर केले. याचिकाकर्तीतर्फे अ‍ॅड. नीलेश काळवाघे यांनी कामकाज पाहिले.वादग्रस्त आदेश रद्दपडताळणी समितीने १३ नोव्हेंबर २०१४ रोजी आदेश जारी करून, सोनटक्के यांचा अनुसूचित जाती प्रवर्गाचे वैधता प्रमाणपत्र मिळण्याचा दावा फेटाळला होता. तो वादग्रस्त आदेश उच्च न्यायालयाने अवैध ठरवून रद्द केला. तसेच, सोनटक्के यांना तीन महिन्यात वैधता प्रमाणपत्र जारी करण्याचे निर्देश समितीला दिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयOrder orderआदेश केणे