शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

गैरसोयीमुळे अनेक हज यात्रेकरूंची प्रकृती बिघडली

By admin | Updated: September 25, 2014 01:34 IST

तासन्तास ताटकळत ठेवल्यानंतर एका नादुरुस्त विमानात बसवून विमानतळ प्रशासनाने हज यात्रेला जाणाऱ्या भाविकांची कुचंबणा केली. असुविधांमुळे अनेक प्रवाशांची प्रकृती खालावल्याने त्यांचा

नागपूर : तासन्तास ताटकळत ठेवल्यानंतर एका नादुरुस्त विमानात बसवून विमानतळ प्रशासनाने हज यात्रेला जाणाऱ्या भाविकांची कुचंबणा केली. असुविधांमुळे अनेक प्रवाशांची प्रकृती खालावल्याने त्यांचा आणि त्यांच्या नातेवाईकांचा रोष उफाळून आला. यामुळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि हज हाऊस परिसरात मंगळवारी सायंकाळी गोंधळ निर्माण झाला. संतप्त प्रवासी आणि नातेवाईकांनी जोरदार निदर्शने आणि खुर्च्यांची फेकफाक केल्यामुळे राज्य हज कमिटीच्या कार्यालयाच्या खिडक्या फुटल्या.हज यात्रेला जाण्यासाठी मोठ्या संख्येत मुस्लिम यात्रेकरू आपल्या नातेवाईकांसह मंगळवारी पहाटे विमानतळावर पोहचले. मात्र, सकाळच्या पहिल्याच विमानाला प्रदीर्घ विलंब झाला. तासन्तास ताटकळत बसलेल्या यात्रेकरूच्या आरामाची कसलीही व्यवस्था विमानतळ प्रशासनाकडून करण्यात आली नाही. त्यात प्रवाशांना विमानतळाच्या अधिकाऱ्यांकडून विलंबाबाबत समाधानकारक माहिती दिली जात नव्हती. त्यामुळे यात्रेकरू आणि त्यांच्या नातेवाईकांचा रोष उफाळून आला. ते लक्षात आल्यानंतर विमानतळ प्रशासनाने यात्रेकरूंना एका विमानात बसवले. ते विमान नादुरुस्त होते. एसी बंद असल्याने यात्रेकरूंना श्वास घेणे अडचणीचे ठरले. गुदमरल्यासारखे झाल्याने अनेकांची प्रकृती बिघडली. त्यामुळे काहींना खासगी रुग्णालयात रवाना करण्यात आले. हे वृत्त कळताच यात्रेकरूंचे नातेवाईक आणि अन्य काही मुस्लिम बांधव सायंकाळी ५ च्या सुमारास विमानतळावर पोहचले. त्यांनी तेथील अधिकारी तसेच सेंट्रल तंजिम कमिटीच्या पदाधिकाऱ्यांना या गैरसोयीमुळे धारेवर धरले. धक्काबुक्की झाली अन् जोरदार नारेबाजीही सुरू झाली. या गोंधळाची माहिती मुंबई, दिल्लीपर्यंत पोहचल्याने विमानतळ प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांना वरिष्ठांकडून जाब विचारण्यात आला. या पार्श्वभूमीवर, अखेर विमानतळ प्रशासनाने हज यात्रेकरूंची सोय केली. विलंबाने का होईना मंगळवारी उशिरा रात्री आणि आज सकाळी हज यात्रेकरू यात्रेसाठी रवाना झाले. (प्रतिनिधी)पोलिसांनी घेतली नोंदहज यात्रेकरूंची झालेली गैरसोय लक्षात घेता दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी करीत मोठ्या संख्येत मुस्लिम बांधव मंगळवारी रात्री सोनेगाव ठाण्यात धडकले. गणेशपेठ ठाण्यातही मुस्लिम बांधवांनी संबंधित पदाधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. अधिकृत तक्रार मिळाली नसल्यामुळे दोन्ही ठिकाणी स्टेशन डायरीवर नोंद घेण्यात आली. मात्र, गुन्हे दाखल झाले नसल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.